For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेलंगणात सैन्यठिकाणावरून शस्त्रास्त्रांची चोरी

07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
तेलंगणात सैन्यठिकाणावरून शस्त्रास्त्रांची चोरी
Advertisement

5 रायफल्स अन् 7 पिस्तुलांसमवेत दारूगोळा गायब

Advertisement

वृत्तसंस्था/सिकंदराबाद

तेलंगणाच्या सिकंदराबाद येथील सैन्याच्या एका ठिकाणावरून असॉल्ट रायफल्स आणि पिस्तुलांसमवेत मॅगजीन आणि दारूगोळाही चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. चोरीच्या घटनेनंतर सैन्याधिकाऱ्यांनी शस्त्रास्त्रs गायब होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एक विस्तृत अंतर्गत चौकशी सुरु केली आहे. एफआयआरनुसार 5 असॉल्ट रायफल्स, 7 पिस्तुल तसेच 21 मॅगजीन आणि दारूगोळा, एक पॅसिव्ह नाइट व्हिजन दुर्बीण चोरीला गेली आहे. गोदाम सुविधेच्या दरवाजांचे टाळे तोडलेल्या अवस्थेत आढळून आले. शस्त्रास्त्रs अन् दारुगोळ्याचे स्वरुप पाहता त्यांचा गैरवापर होण्याची भीती आहे. सैन्याने गायब शस्त्रास्त्रs आणि दारूगोळ्याचा शोध घेण्यासाठी आणि आरोपींची ओळख पटविण्यासाठी आवश्यक अन् तत्काळ कारवाईची विनंती केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सिकंदराबादमध्ये मद्रास रेजिमेंटच्या (20 व्या बटालियन) एका लेफ्टनंट कर्नलच्या तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Advertisement

चोरीबद्दल कधी कळले?

चोरीच्या घटनेचा थांगपत्ता 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.50 वाजता दारूगोळा भांडाराच्या दरवाजावरील टाळे तुटलेल्या अवस्थेत आढळून आल्यावर लागला. तक्रारीनुसार शस्त्रास्त्रs/दारूगोळ्याची अंतिम भौतिक उपस्थिती 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता नोंदविण्यात आली होती. चोरी झाल्याचे कळताच सैन्याच्या युनिटच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ आवश्यक पावले उचलली. सैन्याधिकाऱ्यांनी अंतर्गत चौकशीही सुरु केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.