सांबरा शिवारातील बळळारी नाल्यावरील दोन विद्युत मोटारींची चोरी
11:20 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वार्ताहर/सांबरा
Advertisement
सांबरा येथील शिवारातील बळळारी नाल्यावरील दोन विद्युत मोटारी चोरीस गेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील शेतकरी काशिनाथ धर्मोजी व महादेव कोकितकर यांच्या मालकीच्या बळळारी नाल्यावरील दोन विद्युत मोटारी चोरट्यांनी लांबविल्या आहेत. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेताला गेले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर मारिहाळ पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. मागीलवर्षीही येथील विद्युत पंपांच्या अनेक विद्युत तारा लंपास करण्यात आल्या होत्या. शिवारात वारंवार चोऱ्यांचे प्रकार घडत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरी पोलिसांनी चोऱ्यांचा तपास लावावा. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Advertisement
Advertisement