महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आचरा ग्रामपंचायतने बसवलेल्या सौर पथदिव्यांची चोरी

10:48 AM Oct 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आचरा गावात चोरीचे सत्र चालूच, आचरा पोलिसांसमोर चोरी रोखण्याचे आव्हान

Advertisement

आचरा | प्रतिनिधी

Advertisement

आचरा बाजारपेठेत चोरी होण्याची घटना ताजी असताना आचरा ग्रामपंचायततर्फे आचरा -देवगड रस्त्यावर पारवाडी येथे बसविण्यात आलेल्या सौर पथदिव्यांचे लोखंडी पोल वाकवून तीन पथदिव्यांची बॅटरी व पॅनेल चोरून नेण्याची घटना गुरुवारी रात्री घडली. तब्बल 66 हजाराचे पथदिव्यांचे साहित्य चोरीस गेल्याने आचरा ग्रामपंचायतचे नुकसान झाले असून याबाबतची तक्रार आचरा ग्रामपंचायत कडून आचरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे . आचरा भागात चोरीचे प्रमाण वाढू लागल्याने होणाऱ्या चोऱ्या रोखण्याचे आव्हान आचरा पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

चोरी झाल्याची माहिती समजताच शुक्रवारी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत ग्रामपंचायत सदस्य चंदू कदम, ग्रामपंचायत लिपिक नरेश परब आदी उपस्थित होते. आचरा ग्रामपंचायतकडून चोरीस गेलेल्या वस्तूचा पंचनामा घालून आचरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.आचरा - देवगड रस्त्यावर ग्रामपंचायत तर्फे सौर पथदिवे बसविण्यात आले होते. या भागात विद्युत पोल नसल्याने सौर पथदिवे बसवण्यात आले होते. त्यामुळे आचरा- देवगड रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांना त्याचा उपयोग होत होता. गुरुवारी रात्री अज्ञाताने यातील तीन पथदिवे बसविलेले लोखंडी पोल वाकवून जमिनीवर आडवे पाडत पथदिव्यांची बॅटरी व सोलर पॅनल चोरुन सुमारे ६६,००० हजाराचे नुकसान केले. याबाबत शेती राखण्यासाठी आलेले शेतकरी जितेंद्र पळसंबकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री एक दिड वाजण्याच्या सुमारास या भागात दुचाकी आल्याचे त्यांना लांबून दिसले होते. कोणीतरी प्रवाशी असतील म्हणून त्यांनी दुर्लक्ष केल्याचे सांगितले.याबाबत आचरा ग्रामपंचायत तर्फे लेखी तक्रार दिल्याचे सरपंच फर्नांडिस यांनी सांगितले.आचरा पोलिसांसमोर चोरी रोखण्याचे आव्हान

मागील आठवड्यात भर दिवसा सोनाराच्या दुकानात चोरी करून चोरटे फरार होण्याची घटना घडली होती. यानंतर गुरुवारी रात्री रस्त्यावर बसवलेल्या सौर दिव्यांची बॅटरी व पॅनल चोरून नेले.वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलीसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. याबाबत चोरांचा छडा लागत नसल्याने चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याचे आचरा भागात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी आचरा ग्रामस्थांमधून होत आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg # news update # konkan update # sindhudurg news # marathi news
Next Article