For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime : देवघरातील चांदीच्या मूर्तींची चोरी; लक्ष्मीपुरी पोलिसांकडून महिलेला अटक

02:00 PM Feb 24, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   देवघरातील चांदीच्या मूर्तींची चोरी  लक्ष्मीपुरी पोलिसांकडून महिलेला अटक
Advertisement

                                         देवघरातील सोन्या-चांदीच्या वस्तूंवर डल्ला

Advertisement

कोल्हापूर : दुपारच्या वेळी घरात प्रवेश करुन देवघरातील चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या महिलेस लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. मानसी लक्ष्मीकांत खरे (वय ५०, रा. सानेगुरुजी वसाहत) असे तिचे नांव आहे. तिच्याकडून शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ येथील दोन गुन्हे उघडकीस आले असून, ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रबार पेठ येथील उदय देवरुखकर यांच्या घरातून २३ डिसेंबर २०२५ रोजी चोरी झाली होती. त्यांच्या घरातील १ लाख ८५ हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या मूर्ती, सोन्याचे किरीट, मणी असे साहित्य चोरीस गेले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना ही चोरी साने गुरुजी येथील मानसी खरे यांनी केल्याचे समोर आले.

Advertisement

यानुसार पोलिसांनी खरे हिला ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, तिने चोरीची कबुली दिली. तिच्या ताब्यातून ३ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्रीराम कणेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड, गुन्हे शोध पथकातील हवालदार एकनाथ कळंत्रे, प्रीतम मिठारी, गजानन परीट, मंगेश माने, किशोर पवार, तानाजी देवणे यांनी ही कारवाई केली.

Advertisement
Tags :

.