For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचरा बाजारात साईप्रसाद ज्वेलर्स दुकानातून दागिन्यांची चोरी

08:18 PM Oct 16, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आचरा बाजारात साईप्रसाद ज्वेलर्स दुकानातून दागिन्यांची चोरी
Advertisement

दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून आले; अन् दागिने लंपास करून गेले

Advertisement

दुचाकी वरून आलेले दोन अज्ञात चोरटे cctv त कैद

आचरा प्रतिनिधी

Advertisement

आचरा बाजारपेठेतील साईप्रसाद ज्वेलर्स दुकानात तब्बल सव्वादोन लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. सोने खरेदी करण्याचा बहाणा करत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी  काउंटरवरील ठेवलेला सोन्याच्या दागिन्याचा पाऊच लंपास करत चोरी केली आहे. ही घटना सायंकाळी 4.30 च्या दरम्यान घडली. काऊंटर असलेला पाऊच गायब झाला असल्याचे दुकान मालक अरुण कारेकर यांच्या काहीवेळाने लक्षात येताच बाजूच्या व्यापाऱ्यांना सांगत पोलिसांना खबर दिली .सदर अज्ञात चोरटे आचरा बाजारातील काही दुकानाच्या व आचरा तिठा येथील रस्त्यावर लावण्यात आलेल्या cctv दिसून आले आहेत. सदर घटनेची फिर्याद दाखल करण्याचे काम आचरा पोलीस ठाण्यात चालू होते.

आचरा बाजारपेठ येथील अरुण गणेश कारेकर यांच्या साईप्रसाद ज्वेलर्स दुकानात सायंकाळी दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आले होते. वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने दाखवण्यास सांगितले. यावेळी दुकान मालक कारेकर यांनी त्यांना काही दागिने दाखवले. परंतु ,दागिने पसंत नसल्याचे सांगत दुकानातुन गोल 30 रुपयाचा तावीज खरेदी केला व लागलीच दुचाकीवर आचरा तिठ्याच्या दिशेने निघून गेलेत. कारेकर हे दाखवलेले दागिने पुन्हा आत ठेवत असताना काउंटरवर असलेले सोन्याचे 8 मणी, सोन्याची 12 डावली, सोन्याचे 1 पेंडल असे 20 ग्रॅम वजनाचे दागिने असलेला पाऊच गायब असल्याचे लक्षात आले. सुमारे सव्वादोन लाख रुपयाचे दागिने असल्याची माहिती कारेकर यांनी दिली.

अज्ञात चोरटे cctv त झालेत कैद

आचरा बाजारपेठेत दागिने लंपास करून दुचाकीवरून निघून गेलेले अज्ञात दोन इसम हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. आचरा पोलिसांना आचरा तिठ्यावर असलेल्या कॅमेऱ्यात हे अज्ञात चोरटे कणकवली वरून आचरापेठेत दिसून आले आहेत. तसेच आचरा बाजारपेठेतील एका भुसारी दुकानात चढून काही वस्तू खरेदी करताना हे चोरटे त्या दुकानाच्या सीसीटिव्हीमध्ये दिसून आले . त्यानंतर ते कारेकर यांच्या दुकानात प्रवेश करताना दिसून आलेत. कारेकर यांच्या दुकानातून बाहेर पडत हे चोरटे मालवणच्या दिशेने गेल्याचे दिसत आहे. सीसीटीव्हीतत दोन्ही इसम स्पष्ट दिसत असून निळ्या रंगाची होंडा कंपनीची sp शाईन दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Advertisement
Tags :

.