For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी खुर्द महालक्ष्मी मंदिरात देवीच्या दागिन्यांची चोरी

06:22 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी खुर्द महालक्ष्मी मंदिरात देवीच्या दागिन्यांची चोरी
Advertisement

वैभवनगरमधील चर्चमध्येही चोरी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव शहर व तालुक्यात चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत. गुन्हे जास्त आणि तपास कमी या स्थितीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आता चोरट्यांनी धार्मिक स्थळांना आपले लक्ष्य बनविले आहे. कंग्राळी खुर्द येथील महालक्ष्मी मंदिरात व वैभवनगर परिसरातील एका चर्चमध्ये चोरी झाली आहे.

Advertisement

चोरट्यांनी धार्मिकस्थळांना लक्ष्य बनवल्याने पोलीस दलाचीही धावपळ उडाली आहे. कंग्राळी खुर्द येथील श्री लक्ष्मीदेवी मंदिराचे कुलूप फोडून देवीच्या अंगावरील चांदीचे किरीट, पाच मंगळसूत्रे व इतर पूजा साहित्य असे 10 ग्रॅम सोने व 135 ग्रॅमहून अधिक चांदी चोरट्यांनी पळवली आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चोरीचा हा प्रकार घडला आहे. शनिवारी हा प्रकार उघडकीस येताच एपीएमसी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शारदा बडीगेर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.

दो•प्पा नागाप्पा सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एपीएमसी पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक खाजा हुसेन व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली असून फुटेज ताब्यात घेऊन त्यांचा माग काढण्यात येत आहे.

चर्चमध्येही चोरी

दरम्यान, वैभवनगर सत्यसाई कॉलनीजवळील एका चर्चमध्येही चोरीची घटना घडली आहे. चर्चचे कुलूप फोडून प्रार्थना साहित्य पळविण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून चर्च परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही चोरट्यांची छबी कैद झाली आहे. यासंबंधी शनिवारी रात्री एपीएमसी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.