For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठ लाख मधमाश्यांचीच चोरी

06:22 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
आठ लाख मधमाश्यांचीच चोरी
Advertisement

अलिकडच्या काळात माणसे कशाकशाची चोरी करतील, हे सांगता येणे कठीण आहे. अशाच प्रकारची ऑस्ट्रेलियातील एक चोरी सध्या जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. ऑस्ट्रेलियात चक्क मधमाश्यांची चोरी झाली आहे. चोरट्यांनी आठ लाखांहून अधिक मधमाश्या चोरल्याने मोठीच खळबळ उडाली आहे. ही घटना या देशाच्या क्वीन्सलँड प्रांतातील आहे. येथे एका मधमाशी पालन केंद्रात चोर शिरले. त्यांची योजना या केंद्रातील मध चोरुन नेण्याची होती. तथापि, त्यांनी मधाची चोरी न करता मधमाश्यांवरच डल्ला मारला. या मधमाश्या मध साठवणुकीसाठी असलेल्या लाकडी खोक्यांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी या माश्या चोरताना बरीच दक्षता बाळगल्याचे दिसून आले. त्यांनी या खोक्यांची झाकणे जशी होती तशी, पुन्हा बसविली. पण आतील माश्या मात्र चोरुन नेल्या. बाहेरुन खोकी व्यवस्थित दिसत असल्याने झालेली चोरी लवकर कोणाच्या लक्षात येणार नाही, अशी चोरट्यांची अपेक्षा होती. या मधमाश्या चोरांनी ट्रकमधून नेल्याचे नंतर स्पष्ट झाले.

Advertisement

या चोरट्यांनी ही मधमाश्यांची चोरी का केली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मधमाश्यांचा त्यांना उपयोग काय, असे विचारले जाऊ लागले आहे. या प्रश्नाचे उत्तर अॅव्होकॅडोच्या शेतीत दडलेले आहे. अॅव्होकॅडो हे अतिशय महाग फळ आहे. या फळाच्या बागांमध्ये मधमाश्या पाळल्या जातात. या मध्यमाश्यांमुळे अॅव्होकॅडोच्या फुलांचे परागीभवन लवकर आणि चांगल्याप्रकारे होते. त्यामुळे अॅव्होकॅडो फळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात येते. चोरट्यांनी या मधमाश्या त्यांच्या अॅव्होकॅडोच्या बागांमध्ये सोडण्यासाठी चोरल्या असाव्यात असे प्राथमिक अनुमान आहे. ज्यांनी या मधमाश्या पाळल्या होत्या, ते चार शेतकरी त्यांच्या अॅव्होकॅडोच्या बागांमध्ये या माश्या दिवसा सोडत होते. अॅव्होकॅडोच्या शेतीसमवेत जोडव्यवसाय म्हणून ते मधनिर्मितीचा व्यवसायही करीत आहेत. यासाठी त्यांनी मधमाश्या पाळल्या होत्या. पण आता त्या चोरीला गेल्याने त्यांच्या अॅव्होकॅडोच्या बागांची मोठ्या प्रमाणात हानी होईल, अशी चिंता त्यांना वाटते. आता मधमाश्या चोरीला गेल्याने अॅव्होकॅडोच्या पिकाला मोठा फटका बसेल. परिणामी, हे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.