For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुमारस्वामी लेआऊटमधील चोरीचा दीड वर्षानंतर लावला छडा

07:20 AM Aug 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
कुमारस्वामी लेआऊटमधील चोरीचा दीड वर्षानंतर लावला छडा
Advertisement

एपीएमसी पोलिसांकडून हुबळीच्या चोरट्यांना अटक

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

कुमारस्वामी लेआऊट परिसरात दीड वर्षापूर्वी झालेल्या एका चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात एपीएमसी पोलिसांना यश आले आहे. हुबळी येथील दोन तरुणांना अटक करून त्यांच्याजवळून सुमारे 6 लाख किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. नंदीश ऊर्फ बेंकी नंद्या उमेश सक्रेप्पन्नावर (वय 29) राहणार नागशेट्टीकोप्प-केशवापूर, हुबळी, मंजुनाथ इराप्पा बंडीव•र (वय 28) राहणार देशपांडेनगर-मारुतीनगर, हुबळी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीचे पोलीस निरीक्षक यु. एस. आवटी, उपनिरीक्षक एस. के. होळेण्णावर, विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक विभागाच्या मदतीने या जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळून 6 लाख 11 हजार 526 रुपये किमतीचे 41.43 ग्रॅम सोने व 93.45 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

कुमारस्वामी लेआऊट येथील शाबू दिलीप कांबळे यांच्या घरी 4 मार्च 2025 रोजी चोरी झाली होती. यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास लागला नाही म्हणून पोलिसांनी न्यायालयात सी रिपोर्ट दाखल केला होता. न्यायालयाच्या परवानगीने या प्रकरणाचा तपास पुन्हा हाती घेऊन हुबळी येथील जोडगोळीला अटक केली आहे. या जोडगोळीने एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

Advertisement
Tags :

.