For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : ईश्वरपूर तालुक्यातील चोरी प्रकरणामुळे परिसरात दहशत

04:35 PM Dec 14, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   ईश्वरपूर तालुक्यातील चोरी प्रकरणामुळे परिसरात दहशत
Advertisement

                     ईश्वरपूर ताकारीत ज्वेलर्स दुकानावर मोठी चोरी

Advertisement

ईश्वरपूर : बाळवा तालुक्यातील ताकारी येथील बसस्थानक परिसरातील महेश हणमंत पाटील रा. बांबवडे ता. पलूस यांचे महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकानाची मागील भिंत फोडून अज्ञात चोरट्याने आता प्रवेश करून सुमारे ९ लाख ३४ हजार ४५० रूपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना शुक्रवार दि. १२ रोजी सायंकाळी ६ ते दि. १३ रोजी सकाळी १०.३० च्या दरम्यान घडली.

महेश पाटील यांचे महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे सोन्याचांदीचे दुकान आहे. शुक्रवार दि. १२ रोजी सायंकाळी ६ वा. ते दुकानास बंद करून ते घरी गेले होते. शनिवार दि. १३ रोजी सकाळी १०.३० वा. त्यांनी दुकान उघडले. दुकानात आत प्रवेश केला असता त्यांना मागील भिंत पडलेली दिसली. दुकानातील ३ लाख ५२ हजार १४० रूपयांचे सोन्याचे दागिने, ५ लाख ७२ हजार १३० रूपयांचे चांदीचे दागिने व रोख रक्कम १० हजार असे सुमारे ९ लाख ३४ हजार ४५० रूपयांचा ऐवज लंपास केल. याप्रकरणी महेश हणमंत पाटील यांनी फिर्याद दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.