For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरस्वतीनगरातील बंद घराचा कडीकोयंडा तोडून जबरी चोरी

06:55 AM Feb 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
सरस्वतीनगरातील बंद घराचा कडीकोयंडा तोडून जबरी चोरी
Advertisement

घरमालक परगावी गेल्याने साधला डाव : सोन्याचे दागिने, 40 हजार रुपये रोकड चोरट्यांनी लांबविली 56

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

सरस्वतीनगर, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी येथे घरफोडीची घटना घडली आहे. शनिवारी ही घटना उघडकीस आली असून बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविली आहे. कॅम्प पोलीस स्थानकात रात्री या घटनेची नोंद झाली आहे.

Advertisement

अँथोनी डिक्रूज यांच्या घरी चोरी झाली आहे. ते सध्या राजस्थानमध्ये आहेत. 16 जानेवारी रोजी सायंकाळी ते आपल्या पत्नीसमवेत आपल्या मुलीकडे गेले आहेत. परगावी गेल्यामुळे त्यांच्या घराला कुलूप लावण्यात आले होते. चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला असून तिजोरीतील सोन्याचे दागिने व 40 हजार रुपये रोकड पळविण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 250 ग्रॅम दागिन्यांची चोरी झाली आहे. प्रत्यक्षात अँथोनी डिक्रूज व त्यांचे कुटुंबीय राजस्थानहून बेळगावला परतल्यानंतर याविषयी अधिक माहिती मिळणार आहे. घटनेची माहिती समजताच कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बंद घरांना लक्ष्य बनविणाऱ्या गुन्हेगारांच्या कारवाया वाढल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी किंवा एखादी घटना घडल्यानंतर लवकरात लवकर चोरट्यांचा माग काढण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहे. घराला कुलूप लावून परगावी जाताना जवळच्या पोलीस स्थानकाला माहिती देण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांकडून वारंवार केले जाते. वेगवेगळ्या उपनगरात नागरिकांची बैठक घेऊनही अधिकारी यासंबंधी मार्गदर्शन करतात. तरीही चोरीचे प्रकार थांबता थांबेनात.

Advertisement
Tags :

.