For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कडोली महालक्ष्मी मंदिरात चोरी

11:39 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
कडोली महालक्ष्मी मंदिरात चोरी
Advertisement

50 हजार रु. किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Advertisement

वार्ताहर/कडोली

येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवरील सुमारे 50 हजार रु. किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना कडोली येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. सदर चोरीचा प्रकार शुक्रवारी पहाटे पुजारींच्या नजरेस पडला. त्यांनी हा चोरीचा प्रकार देवस्थान पंच कमिटीला कळविल्यानंतर पंच कमिटीने चोरी झालेल्या दागिन्यांची शहानिशा केली. यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, चांदीचे दोन हार आणि इतर काही किरकोळ दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले आहे. देवस्थान पंच कमिटीचे धनंजय कटांबळे, दीपक मरगाळे, कल्लाप्पा सनदी, अशोक कणबरकर आदींनी मंदिराला भेट देऊन सविस्तर माहिती पुजारी दत्ता सुतार यांच्याकडून घेतली. गेल्या 2-3 वर्षांपूर्वी याच मंदिरात चोरीचा प्रकार घडल्याने ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. देवस्थान पंच कमिटीने चोरीच्या घटनेची नोंद काकती पोलीस ठाण्यात केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.