आंबेगाव येथील तरुणाचा पूरात वाहून गेल्याने मृत्यू
ओटवणे । प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव - रुपणवाडी येथील प्रशांत चंद्रकांत दळवी (38 ) या तरुणाचा पूराच्या पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी सावंतवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी शरद लोहकरे, श्री धोत्रे ,श्री सावंत, पोलीस हवालदार घटनास्थळी जात पंचनामा केला . दरम्यान काल मुसळधार पावसामुळे रुपणवाडी येथील पुलावर आलेल्या पुराच्या पाण्यातून चालत जात असताना प्रशांत दळवी पुराच्या पाण्यातून वाहून गेले. सोमवारी सायंकाळी ही घटना समजल्यानंतर आंबेगाव ग्रामस्थांसह पोलीस महसूल अधिकारी तलाठी यांनी शोध मोहीम राबवली मात्र काळोख झाल्यामुळे ही शोधमोहीम थांबवण्यात आली . त्यानंतर कुणकेरी येथील रवीचे भाटले येथे प्रशांत दळवी याचा मृतदेह आढळून आला. दळवी याच्या पश्चात पत्नी ,आई-वडील ,मुलगा ,मुलगी ,भाऊ , भाऊजी असा परिवार आहे . पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला . यावेळी सरपंच शिवाजी परब, पोलीस पाटील लक्ष्मण गावडे ,उपसरपंच रमेश गावडे आदी उपस्थित होते .