महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोटर सायकलचा वेग न आवरल्याने कॅनॉलमध्ये पडून युवक जागीच ठार

07:01 PM Dec 13, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

रेंगाळलेल्या पुलाच्या कामाने घेतला पहिला बळी

वारणानगर / प्रतिनिधी

येथील कोडोली - पोखले रोडवरून जात असताना चालवत असलेल्या हिरो मोटर सायकलचा वेग न आवरल्याने वारणा कॅनॉलमध्ये (कालव्यात) पडून तरुण जागीच ठार झाला. सूरज रमेश जाधव वय २३ रा. देवाळे ता. पन्हाळा असे त्याचे नाव आहे.

Advertisement

विनायक राजाराम जाधव यानी याबाबत फिर्याद दिली आहे.पोखले ते कोडोली जाणारे रोडने सुरज वेगाने जात असताना कोडोली गायचे हद्दीत बारणा कॅनॉल जवळ झाला असता त्याला तो चालवीत असलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटर सायकल न आवरलेने तो मोटरसायकलसह कॅनालमध्ये पडुन गंभीर जखमी होवुन अपघात होवून त्यामध्ये तो उपचारापूर्वीच मयत झाला.

Advertisement

मोटरसायकल आपघात बुधवारी दि. १३ रोजी १ वा . चे सुमारास घडला घटनास्थळी कॅनॉल सुमारे ४० फूट खोल असल्याने सूरजचा मृतदेह काढण्यास मोठे परिश्रम घ्यावे लागले. फौजदार दांडगे, नरेंद्र पाटील तपास करीत आहेत.

रेंगाळलेल्या कॅनॉल वरील पुलाच्या कामाचा पहिला बळी...
पाटबंधारे विभागाने वारणा कॅनॉल उकरून गेली काही वर्षे काम जैसे थे आहे. कोडोली - पोखले दरम्यान कॅनॉलवर होणाऱ्या नवीन पूलाचे काम गेली दोन वर्षाहून अधिक काळ रेंगाळलेले आहे याच कॅनॉलवर तात्पुरता केलेला कच्चा पर्यायी रस्ता देखील त्रासदायक ठरत आहे वेळेत काम ठेकेदार करीत नसल्याने रेंगाळलेल्या या पूलाच्या कामाने आपघाताच्या माध्यमातून पहिला बळी घेतला आहे.

Advertisement
Next Article