कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युवापिढीने शिवराय अभ्यासावेत

06:45 AM Dec 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘लोकमान्य’चे संचालक पंढरी परब यांचे प्रतिपादन : दिवाळी किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज हे युवापिढीसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे युद्धकौशल्य आजही जगभरात वापरले जाते. नौसेनेचे जनक म्हणूनही शिवरायांचा उल्लेख केला जातो. आपल्यासमोर कितीही मोठे आव्हान असले तरी आत्मविश्वासाच्या जोरावर आपण कोणतेही आव्हान पेलू शकतो, हे शिवरायांनी आपल्या प्रत्येक कार्यातून दाखवून दिले. युवापिढीने त्यांच्या कार्याचा अभ्यास करून प्रगल्भ समाज घडवावा, असे प्रतिपादन लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब यांनी काढले.

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने आयोजित केलेल्या ‘लोकमान्य दिवाळी किल्ला स्पर्धा-2025’चा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी आचार्य गल्ली, शहापूर येथील श्रीराम मंदिर परिसरात पार पडला. व्यासपीठावर लोकमान्य सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर, संचालक विठ्ठल प्रभू, सीईओ अभिजित दीक्षित उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

पंढरी परब पुढे म्हणाले, आजची पिढी ही मोबाईलमध्ये अडकून पडली आहे. मोबाईल या तंत्रज्ञानामागे ज्ञान मिळवण्यासाठी असा हेतू होता. परंतु, ज्ञान मिळवण्याऐवजी केवळ मनोरंजन आणि वेळ घालवण्यासाठीचे साधन म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. याचा परिणाम युवापिढीच्या आरोग्यावर होत असल्याने मोबाईलपासून दूर रहात नवनवीन ज्ञान आत्मसात करा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

संचालक गजानन धामणेकर म्हणाले, लोकमान्य सोसायटीचे संस्थापक डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून लोकमान्य किल्ला स्पर्धा सुरू झाली. युवापिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले समजण्यासोबतच त्यांना शिवरायांच्या स्थापत्यकलेची जाणीव व्हावी यासाठी अशा स्पर्धा होणे गरजेचे आहे. या किल्ला स्पर्धेमध्ये शंभरहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. परीक्षकांनी अतिशय बारीक निरीक्षण करून निकाल दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. शहापूर, टिळकवाडी, अनगोळ, वडगाव व बेळगाव विभागातील लहान व मोठ्या गटातील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर हळदणकर यांनी केले. उपस्थितांच्या हस्ते उत्कृष्ट मांडणी तसेच परीक्षकांचाही सन्मान झाला. यावेळी शहरातील विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article