युवतीला पाण्याचीच अॅलर्जी
खाण्यापिण्याच्या गोष्टींपासून धूळ आणि पाण्यासमवेत 40 हून अधिक गोष्टींची एका युवतीला अॅलर्जी आहे. या दुर्लभ आजारानंतरही ती अत्यंत आनंदी असते. परंतु तिला नेहमीच अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि काहीही खाणे, कुठेही जाणे किंवा काहीही करण्यापूर्वी सतर्क रहावे लागते.
19 वर्षीय क्लो रामसे यांना जन्मापासूनच खाद्य अॅलर्जी होती. केळी आणि बटाट्यासारख्या काही गोष्टी खाल्ल्यावर तिला एनाफाइलॅक्टिक शॉक यायचा. परंतु बालपणी झालेल्या उपचारामुळे तिला आता अॅलर्जीमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागत नाही. सद्यकाळात रामसेकडे 40 गोष्टींची एक अशी यादी आहे, ज्या तिच्या तोंडात आणि गळ्यात धोकादायक स्वरुपात सूज निर्माण करतात, किंवा तिच्या त्वचेवर गंभीर प्रभाव पाडत असतात.
अनेक प्रकारच्या फळांपासून अॅलर्जी
खाण्याच्या गोष्टींमध्ये केळी, कीवी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी, नाशपती आणि द्राक्षे यासारख्या अनेक गोष्टींमुळे तिला अॅलर्जी होते. क्लोई जून 2023 मध्ये पराग खाद्य सिंड्रोमने पीडित असल्याचे निदान झाले. पॉलिनेशनपासून तयार होणारे कुठलेही फळ किंवा भाजीमुळे तिला अॅलर्जी होते, यात मिठाई, फळे आणि अत्तर देखील सामील आहे.
पाण्याची अॅलर्जी सर्वात असामान्य
क्लोला सर्वात असामान्य अॅलर्जी पाण्याची आहे, ज्याला एक्वाजेनिक अर्टिकेरिया नावाने ओळखले जते. विना औषधाशिवाय स्नान केल्यास तिच्या त्वचेवर फोड येतात आणि पावसात भिजल्यास तिला चाकूने स्वत:ची त्वचा सोलून काढावी असे वाटू लागते. मला पहिल्यांदा अॅलर्जीविषयी कळले तेव्हा मी 6 महिन्यांची होती आणि तेव्हा माझ्या आईने दूध पाजणे बंद केले होते. जर मला बटाटा किंवा केळी खायला देण्यात आल्यास माझ्या शरीराचा रंग निळा पडतो आणि मी बेशुद्ध होते. परंतु सुदैवाने माझ्यात होणारे रिअॅक्शन आता तितके वाईट नाहीत असे क्लो सांगते.
आयुष्यभर घ्यावे लागणार इंजेक्शन
एक दिवस अचानक पाण्याच्या अॅलर्जीची समस्या समोर आली. जेव्हा मी हात धुवत होते, तेव्हा मोठमोठे फोड यायचे आणि माझ्या त्वचेवर मुंग्या फिरत असल्याचे वाटू लागायचे. मला स्वत:च्या या अॅलर्जीवर उपचारासाठी आयुष्यभर इंजेक्शन घ्यावे लागणार असल्याचे तिने सांगितले आहे.
बालपणी रुग्णालयाच्या फेऱ्या
बालपणी क्लो एपिपेन आणि औषध घेण्यासाठी वारंवार रुग्णालयात जात होती. जेव्हा ती केळी किंवा बटाटे खात होती, तेव्हा तिला एनाफाइलॅक्टिक शॉक यायचा आणि तिला त्वरित आपत्कालीन कक्षेत नेले जात होते. काही अॅलर्जी आता समाप्त झाल्या असून तर नवी अॅलर्जी निर्माण झाल्या. आता मी कुठलेही फळ खात नसल्याचे तिचे सांगणे आहे.