यंग शेरलॉक सीरिज लवकरच झळकणार
होम्सच्या भूमिकेत दिसणार हीरो फिएनेस
हीरो फिएनेस टिफिन याला ‘आफ्टर’ मुव्ही फ्रेंचाइजीमुळे (2019-2023) ओळख मिळाली. आता तो यंग शेरलॉक होम्सच्या रुपात परतणार आहे. रॉबर्ट डाउनी ज्युनियर आणि बेनेडिक्ट कंबरबॅचच्या एडल्ड शेरलॉकच्या व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्यावर हीरो होम्सचे किशोरवयीन दिवस आणि तो कसा प्रसिद्ध हेर झाला हे दाखविणार आहे.
आगामी ब्रिटिश सीरिज
शेरलॉक होम्सच्या किशोरवयीन काळाला दाखविणार असून तेव्हा तो केवळ ऑक्सफोर्ड विद्यापीठाचा विद्यार्थी होता आणि कॉलेज परिसरात झालेल्या एका मर्डर मिस्ट्रीत अडकला होता. कहाणी 1868 मध्ये शेरलॉकच्या वयाच्या 14 व्या वर्षापासून सुरू होते, तेव्हा त्याच्या पित्याची पोस्टिंग भारतात झालेली असते आणि त्याला
हॅम्पशायरमध्ये स्वत:च्या नातेवाईकांसोबत राहण्यासाठी पाठविण्यात आलेले असते. कमी वयातच तो इंग्लंडमधील रहस्यमयी मृत्यूंपासून रशिया आणि चीनमधील कटांपर्यंतच्या गुन्ह्यांची उकल करण्यास सुरुवात करतो.
शेरलॉकने स्वत:चे कौशल्य कसे मिळविले हे या सीरिजमध्ये पाहता येणार आहे. एका चिनी ट्यूटरकडून तो मार्शल आर्ट्स आणि एका संगीतकाराकडून वायोलिन शिकत असल्याचे दाखविले जाणार आहे. यंग शेरलॉकमध्ये होम्स आणि जॉन वॉटसन यांची पहिली भेट लंडनच्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये झाल्याचे दाखविले जाऊ शकते.
नवी सीरिज 4 मार्चपासून
अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे. ही सीरिज एंड्य्रू लेन यांच्या यंग शेरलॉक नावाच्या पुस्तकावर आधारित असून यात 8 एपिसोड्स आहेत. हीरो फिएनेस टिफिन हा 19 वर्षीय शेरलॉक होम्सची भूमिका साकारतोय. तर मॅक्स आयरन्स त्याचा मोठा भाऊ मायक्रॉफ्टच्या भूमिकेत आहे. जोसेफ फिएनेस आणि नताशा मॅकएलहोन त्याच्या आईवडिलांची भूमिका साकारत आहेत.