कर्ली नदीपात्रात उडी घेतलेला तो तरुण नेरूरचा
आज सकाळी मृतदेह आढळला.
कुडाळ -
दोन दिवसांपूर्वी नेरूरपार पुलावरून कर्ली नदीपात्रात उडी घेतलेल्या त्या तरुणाचा मृतदेह अखेर बुधवारी सकाळी त्याच नदीपात्रात आढळला. नेरूर चव्हाटा वसूसेवाडी येथील विनायक उर्फ सागर मारुती नारिंग्रेकर (35 ) त्या तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्या केली.मात्र,आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. या घटनेमुळे नेरूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सोमवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी तरुणाने नेरुरपार पुलावरून कर्ली नदीत उडी घेतल्याचे तेथून जाणाऱ्या एका रिक्षा व्यावसायिकाने पाहिले होते. मात्र, त्या पात्रात व आजूबाजूला शोध घेतला असता तो बेपता तरुण सापडला नव्हता. दरम्यान , नेरूर चव्हाटा वसूसेवाडी येथील विनायक उर्फ सागर नारिंग्रेकर सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातून निघून गेला होता.तो त्या दिवशी सायंकाळी तसेच मंगळवारी सायंकाळपर्यंत घरी परतला नाही.त्यामुळे कुडाळ पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. ग्रामस्थ त्याचा शोध घेत असताना आज सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह कर्ली नदी पात्रात आढळला. कुडाळचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.ग्रामस्थानी मृतदेह नदीपात्राच्या बाहेर काढला. सोमवारी दुपारी नेरूरपार पुलावरून कर्ली नदी पात्रात उडी घेतलेला तो तरुण सागर नारिंग्रेकर होता.त्याने आत्महत्या केली.त्याचा मृतदेह आज सकाळी त्याच नदीपात्रात आढळला,अशी माहिती पोलिसांनी दिली.