For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नैराश्यातून युवकाने संपवले जीवन ! सडोली दुमाला येथील दुर्दैवी घटना

11:57 AM May 17, 2024 IST | Abhijeet Khandekar
नैराश्यातून युवकाने संपवले जीवन   सडोली दुमाला येथील दुर्दैवी घटना
Sadoli Dumala
Advertisement

सडोली दुमाला येथील युवकांने नैराश्यतून आपले जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार सडोली दुमाला ता. करवीर येथील जयेंद्र शंकर पाटील या २५ वर्षाच्या युवकाने विष प्राशन करून आपले जीवनच संपवून टाकले. अभ्यासात झोकून देऊनही अगदी दोन - चार मार्काच्या फरकाने भरतीत आलेले अपयश, सरकारी नोकरी मिळेना यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले. हुशार, विनयशील, अभ्यासू, सुसंस्कारी स्वभावाच्या जयेंद्र म्हणजे सर्वांच्या लाडक्या जयाच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांसह मित्रांमध्ये ' जया ,भावा चुकीचं वागलास रे' असे भावविवश उदगार बाहेर पडत होते. एकुलता एक मुलगा असणाऱ्या पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Advertisement

बीएससी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अभ्यासातील सातत्य कायम ठेवत त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु ठेवली. सैन्य भरती, पोलीस भरतीसाठी उतरला. मात्र प्रत्येक वेळी अगदी दोन चार मार्काच्या फरकाने त्याला यशाने हुलकावणी दिली. सलग आलेल्या अपयशाने नरेंद्र मानसिकदृष्ट्या खचला जात होता. याच निराशेतून त्याने घरच्यांना कशाचाही पत्ता न लागू देता ( दि.१२) चार दिवसापूर्वी रात्री घरीच विष प्राशन केले. घरच्यांनी तात्काळ त्याला कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. चार दिवस उपचार सुरु राहिले. अखेर उपचारादरम्यान आज गुरुवारी (दि. १६ ) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह गावी आणण्यात आला. यावेळी कुटुंबासह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.