महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सांबरा येथे भंडाऱ्याच्या उधळणीत महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान

10:34 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हजारो भाविकांचा रथोत्सवात सहभाग : भक्तिमय वातावरणाला वरुणराजाचीही साथ

Advertisement

वार्ताहर /सांबरा

Advertisement

सांबरा येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत व भक्तिमय वातावरणात शुक्रवारी सायंकाळी श्री महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान झाली. सकाळी लक्ष्मी मंदिर येथून रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. शुक्रवारी रथोत्सवाचा चौथा दिवस होता. शुक्रवारीही गावातील हजारो अबाल-वृद्ध, तऊणांनी रथोत्सवात भाग घेऊन रथोत्सवाचा आनंद लुटला. भंडाऱ्याच्या उधळणीमुळे सर्व भक्त अक्षरश: भंडाऱ्यात न्हाऊन गेले होते. लक्ष्मी देवीच्या जयजयकारात माऊती गल्लीमार्गे रथ छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आला. यावेळी श्री महालक्ष्मी देवीला विधिपूर्वक रथातून उतरविण्यात आल्यानंतर श्री महालक्ष्मीदेवी गदगेकडे मार्गस्थ झाली. यावेळी देवीचा व्हन्नाट (खेळ) झाला. मंगळवार पेठ, महात्मा फुले गल्ली, गणेशनगर, माऊती गल्ली, रेणुका गल्ली आदी ठिकाणी महालक्ष्मी देवी खेळल्यानंतर गदगेवर विराजमान झाली. त्यानंतर विविध धार्मिक विधी करून फळांचा बळी देण्यात आला. सर्व विधी झाल्यानंतर वरूणराजानेही काही मिनिटे हजेरी लावली. सायंकाळनंतर वाहनांच्या गर्दीमध्ये प्रचंड वाढ झाली. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी मारिहाळ पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. शनिवारी व रविवारी गावामध्ये घरोघरी स्नेहभोजन होणार असल्याने या मार्गावर मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article