महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सापाला मारणारा किडा

06:22 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जे दिसायला साधारण असतात, त्यांच्यापैकी कित्येकांची क्षमता मोठी असू शकते, हे आपल्याला माहिती आहे. हे जसे माणसांच्या संदर्भात खरे आहे, ते प्राणीवर्गाच्या संदर्भातही खरे आहे. अनेक प्राणी किंवा कीटक असे असतात की जे आकाराने लहान आणि किरकोळ दिसणारे असतात. पण त्यांचे सामर्थ्य मोठे असू शकते. आपल्यापेक्षा कैकपट अधिक मोठ्या जीवाचीही ते शिकार करु शकतात.

Advertisement

सध्या एक असा किडा चर्चेत आहे. तो दिसायला किरकोळ आहे. तथापि, त्याला पाहून माणूसही घाबरतो. हा किडा एखाद्या विंचवासारखा किंवा किंवा कोळ्यासारखा दिसतो. सोशल मिडियावर या किड्याचे व्हिडीओ आणि वृत्त मोठ्या वेगाने प्रसिद्ध होत आहे. तो सॉलिफ्यूग नावाचा कीटक आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे. छोट्या दिसणाऱ्या या कीटकाची शक्ती मोठी आहे. तो एका मोठ्या सापालाही मारु शकतो. तो चावल्यास तीव्र वेदना होतात. तो तसा विषारी नाही. पण तो साप किंवा विंचवावरही हल्ला करु शकतो. त्याचा दंश अत्यंत वेदनादायक असल्याने त्या वेदना असह्या होऊन त्याच्यापेक्षा मोठे प्राणी मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे ते या किड्याजवळ येणे टाळतात. या किड्याचा दंश माणसासाठी जीवघेणा असत नाही. पण इतर प्राण्यांच्या जीवासाठी तो धोकादायक ठरु शकतो.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article