जगाची सर्वात छोटी मॉडेल
उंची केवळ 2 फूट 4 इंच
यश आणि साहसी झेप शारीरिक आकार किंवा उंचीवर निर्भर नसते, ही बाब अमेरिकेतील मियामी येथे राहणाऱ्या 23 वर्षीय वाइल्डिन ऑमोइथे हिने खरी दाखवून दिली आहे. वाइल्डिनला जगातील सर्वात छोटी मॉडेल म्हणून ओळखले जाते. केवळ 2 फूट 4 इंच उंची असलेल्या वाइल्डिनने स्वत:च्या दैनंदिन जीवनातील संघर्ष आणि अनुभव शेअर केले आहेत. कमी उंचीसोबत सामान्य जीवन जगणे किती आव्हानात्मक असते हे तिने सांगितले आहे.
काम करण्यासाठी तिला जमिनीवर बसावे लागते, घरात फिरण्यासाठी पॉवर व्हीलचेअरचा वापर करावा लागतो आणि बेडवरून उठण्यासाठी देखील स्वत:च्या आईवर निर्भर रहावे लागते. वाइल्डिनचा जन्म ‘सॅडन डिस्प्लेजिया’ नावाच्या अत्यंत दुर्लभ आजारासोबत झाला होता.
या आजारामुळे वाइल्डिनचे हात-पाय अत्यंत छोटे आहेत, ज्यामुळे दैनंदिन कामं करण्यावरही तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. घरात स्वतंत्र स्वरुपात ये-जा करण्यासाठी मी पॉवर व्हीलचेअरचा वापर करते. लॅपटॉपवर काम करायचे असल्यास मी जमिनीवर बसते, कारण ही स्थिती माझ्या शरीराच्या हिशेबानुसार सर्वात आरामदायक आणि सुलभ असते असे ती सांगते. शारीरिक मर्यादा असूनही वाइल्डिनने कधीच हार मानली नाही. ती एक प्रोफेशनल मॉडेल असण्यासोबत फ्रीलान्स ग्राफिक डिझाइनर देखील आहे आणि स्वत:च्या करियरच्या उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत करत आहे. तिने स्वत:च्या दिनक्रमाला स्वत:च्या आव्हानांनुनसार बदलले आहे. घरात उंचीवर ठेवलेलया गोष्टी उचलणे आणि व्हिलचेअरवरून बेडवर जाण्यासारख्या शारीरिक कार्यांसाठी ती पूर्णपणे स्वत:च्या आईची मदत घेते.
जीवनात पुढे जाण्यासाठी स्वकीयांचे शारीरिक अन् मानसिक सहकार्य अत्यंत महत्त्वपूर्ण असते असे तिचे सांगणे आहे. 2020 मध्ये एका माहितीपटानंतर गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने तिच्याशी संपर्क साधला होता आणि ऑक्टोबर 2021 मध्ये अधिकृत स्वरुपात जगातील सर्वात छोट्या महिलेचा विक्रम तिच्या नावावर करण्यात आला होता.