For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जगातील सर्वात छोटे हरिण

07:00 AM Oct 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
जगातील सर्वात छोटे हरिण
Advertisement

जगातील सर्वात छोटे हरिण पुदू आहे. याचे शरीर इतके छोटे असते की अनेकदा हे घरातील मांजराप्रमाणे वाटते. हे दक्षिण अमेरिकेतील जंगल आणि पर्वतीय भागांमध्ये आढळून येते. इतके छोटे असूनही हे पूर्ण हरिण आहे. नराच्या डोक्यावर छोटी शिंगं देखील असतात, धोका जाणवताच हे वेगाने पळू लागते आणि भुंकण्यासारखा आवाज काढू शकते.पुदूच्या दोन प्रमुख प्रजाती आहेत, नॉर्दर्न पुदू आणि सदर्न पुदू. नॉर्दर्न पुदू कोलंबिया, इक्वेडोर आणि पेरूच्या अँडीज भागात आढळून येते. तर सदर्न पुदू चिली आणि अर्जेंटीनाच्या दक्षिण हिस्स्यांमध्ये आढळून येते. दोन्ही छोटी हरणं आहेत, परंतु नॉर्दर्न पुदूला जगातील सर्वात छोटे हरिण मानले जाते. हे सर्वसाधारणपणे एकटेच राहते आणि घनदाट जंगल, झुडुपं आणि गवताळ भागात राहणे पसंत करते.

Advertisement

नॉर्दर्न पुदूची खांद्यापर्यंतची उंची सर्वसाधारणपणे 35 सेंटीमीटर असते. वैज्ञानिकांच्या नव्या आकडेवारीत याची कमाल उंची 40.5 सेंटीमीटरपर्यंत आढळून आली आहे. याचे वजन सुमारे 6-6.5 किलोग्रॅमपर्यंत असू शकते. याच्या शरीराची लांबी सुमारे 58-74 सेंटीमीटरपर्यंत असू शकते. इतर हरणांच्या तुलनेत याचे शरीर अत्यंत छोटे आहे. सदर्न पुदू नॉर्दर्न पुदूपेक्षा काहीसे मोठे असते. याची खांद्यापर्यंतची उंची सुमारे 35-45 सेंटीमीटर आणि वजन सुमारे 6.5-13.5 किलोपर्यंत असू शकते. तरीही हे जगातील सर्वात छोट्या हरणांमध्ये सामील आहे.

नराच्या डोक्यावर छोटे शिंग

Advertisement

पुदूच्या नराच्या डोक्यावर छोटी शिंगं असतात. हे इतर हरणांप्रमाणे मोठे अन् फैलावलेले नसतात. नॉर्दर्न पुदुची शिंग सरळ अन् टोकदार असतात. त्यांची लांबी 9 सेंटीमीटरपर्यत असू शकते. ही शिंग कायमस्वरुप राहत नाहीत. पुदू त्यांना वेळोवेळी तोडत असतो आणि मग नवी शिंग पुन्हा उगवत असतात. मादीच्या डोक्यावर शिंगं नसतात, सदर्न पुदूच्या नराचे शिंग देखील छोटे असते. त्यांची लांबी सुमारे 6-9 सेंटीमीटरपर्यंत असू शकते. याच्या नरामध्ये सुमारे 9-12 महिन्याच्या वयापासून शिंग उगवण्यास सुरू होते.

धोका जाणवताच काढतो आवाज

पुदू सर्व साधारणपणे एकटा राहणारा प्राणी आहे. नॉर्दनू पुदू अँडीजच्या उंच आणि आर्द्रतायुक्त भागांमध्येच आढळून येतो. हा सुमारे 4 हजार मीटरच्या उंचीपर्यंत राहू शकतो. हा पानं, फळं आणि रोपांच्या हिस्स्यांना खातो. धोका जाणवताच हा प्राणी अत्यंत सतर्क होतो. हा वेगाने पळून घनदाट झुडुपांमध्ये लपण्याचा प्रयत्न करतो. याचबरोबर हा भुंकण्यासारखा आवाज काढू शकतो. हा आवाज इतर पुदूंना धोक्याविषयी सांगण्यास उपयुक्त ठरतो.

जंगल घटणे मोठी समस्या

पुदूसाठी जंगलांचा आकार घटणे मोठी समस्या आहे. नॉर्दर्न पुदूच्या अधिवासांमध्ये शेती आणि मानवी हालचाली वाढल्याने याचा प्रभाव पडत आहे. वैज्ञानिकांनुसार जंगलात या प्रायाच्या एकूण संख्येविषयी अद्याप पूर्ण माहिती नाही. याचमुळे त्यांची संख्या समजून घेण्यासाठी आणखी संशोधनाची आवश्यकता आहे. सदर्न पुदू देखील जंगल कमी होणे आणि मानवी हालचालींमुळे प्रभावित होतो. हा दक्षिण चिली आणि दक्षिण-पश्चिम अर्जेंटीनाच्या आर्द्रतायुक्त जंगलांमध्ये आढळून येतो. याचे छोटे शरीर घनदाट झुडुपांमध्ये लपण्यास मदत करते. अशाप्रकारे पुदूचा आकार भले अत्यंत छोटा असला तरीही हे पूर्णपणे हरिण आहे. छोट्या शरीरासोबत नराच्या डोक्यावरील शिंग आणि धोक्यावेळी भुंकण्यासारखा आवाज याला इतर हरणांपेक्षा वेगळे स्वरुप प्राप्त करून देते.

Advertisement
Tags :

.