जगातील सर्वात मंदगतीची रेल्वे
290 किलोमीटर अंतरासाठी लागतात 8 तास
भारतात हायस्पीड रेल्वे काळासोबत वेगवान होत असताना वंदे भारत, राजधानी किंवा तेजसचा पर्याय लोकांना मिळत आहे. याचबरोबर आता बुलेट ट्रेन येणार आहे. चीन आणि जपान यासारख्या देशांमध्ये अनेक पट वेगवान रेल्वे धावत असते. परंतु जगात एक अशी एक्स्प्रेस आहसे, जी इतक्या कमी वेगात धावते की केवळ 290 किलोमीटरचा प्रवास करण्यासाटी 8 तासांचा वेळ लागतो. यामुळे याला जगातील सर्वात मंदगतीने धावणारी एक्स्प्रेस ट्रेन मानण्यात येते.
स्वीत्झर्लंडच्या ग्लेशियर एक्स्प्रेसला जगातील सर्वात मंदगतीची एक्स्प्रेस रेल्वे मानण्यात येते, कारण ही रेल्वे 29 किलोमीटरचे अंतर 8 तासांमध्ये कापते. ही रेल्वे आल्प्स पर्वतरांगेतून जात असल्याने हा वेग कमी असतो. ग्लेशियर एक्स्प्रेस स्वीत्झर्लंडच्या जर्मैट आणि सेंट मॉरिट्ज या भागांना जातो. ही रेल्वे 36 किलोमीटर प्रतितासाच्या सरासरी वेगाने धावते.
अनेक कारणे
ग्लेशियल एक्स्प्रेस रेल्वेचे एकमात्र काम केवळ एका स्थानावरुन दुसऱ्या स्थानापर्यंत पोहोचविणे नाही. याचा उद्देश प्रवाशांना आल्प्स पर्वतरांगचे सौंदर्य दाखविणे आहे. याचा मार्ग अत्यंत सुंदर असल्याने लोक या रेल्वेतून प्रवास करत असतात. याचमुळे या प्रवासादरम्यान लोक कंटाळत नाहीत. रेल्वेच्या खिडक्या याचमुळे मोठ्या आकाराच्या निर्माण करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशाना पॅनारॉमिक ह्यू पाहता येतो.
वेगवेगळ्या श्रेणीचे डबे
निसर्गसौंदर्यासोबत रेल्वेचा वेग कमी असण्याचे काम रेल्वेमार्ग अत्यंत दुर्गम स्थानावर असल्याने तेथून भरधाव वेगात रेल्वे धावू शकत नाही. काही मार्ग वळणदार तर काही ठिकाणी मोठी चढाई आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा वेग कमी ठेवला जातो. या 8 तासांच्या प्रवासात रेल्वे अनेक वळणदार भुयारांमधून जाते. मार्गात 291 ब्रिज आणि 91 भुयारं येतात. हा प्रवास समुदसपाटीपासून 6670 फुटांच्या उंचीवर होतो. याचबरोबर ग्लेशियर एक्स्प्रेस नॅरो गेज ट्रॅकवर चालते, ज्यामुळे तिला मोठा वेग देता येत नाही. या रेल्वेत फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि सर्वात महाग एक्सिलेंस क्लास असून यात प्रवाशांना पंचतारांकित हॉटेलसारख्या सुविधा पुरविल्या जातात.