For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निसर्गाची लक्ष्मणरेषा याच्या दोन्ही बाजूचे जग अत्यंत वेगळे

06:00 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
निसर्गाची लक्ष्मणरेषा याच्या दोन्ही बाजूचे जग अत्यंत वेगळे
Advertisement

निसर्गाला आम्ही जाणलो असे जेव्हा जेव्हा वाटू लागते, तेव्हा निसर्ग स्वत:चे रहस्य मानवी कल्पनेपेक्षाही गुंतागुंतीचे असल्याची जाणीव करून देतो. रामायणात लक्ष्मणरेषेबद्दल तुम्ही ऐकले असेल. परंतु एक अशीच लक्ष्मणरेषा पृथ्वीवर अस्तित्वात असून ती दिसून येत नाही, परंतु स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देत असते. या रेषेला ओलांडण्याची चूक आकाशात उडणारा पक्षीही करत नाही तसेच समुद्रातील मासेही करत नाहीत. जमिनीवर राहणारा प्राणी देखील ही रेषा ओलांडत नाही. या रेषेच्या दोन्ही बाजूचे जग अत्यंत वेगळे आहे.

Advertisement

इंडोनेशियाच्या दोन बेटांदरम्यान एक रेषा आहे, जी रियल आहे आणि वर्च्युअल देखील. रियल आहे कारण याचे असणे त्याच्या आसपासच्या सृष्टीत स्पष्टपणे दिसते. आणि वर्च्युअल म्हणजे ही रेषा दिसून येत नाही. या रेषेचे नाव वालेस लाइन असून त्याला तुम्ही निसर्गाची लक्ष्मणरेषा म्हणू शकता. ही वालेस लाइन बाली आणि  लोम्बोकदरम्यान आहे. या दोन्ही बेटांदरम्यान सुमारे 35 किलोमीटरचे अंतर असून मध्ये समुद्र आहे. ही रेषा याच ठिकाणी आहे.

वालेस लाइन मलय बेटसमूह आणि इंडो-ऑस्ट्रेलियन बेटसमूहात राहणाऱ्या जीवांना वेगळे करते. मलय बेटसमूह पृथ्वीवरील बेटांचा सर्वात मोठा समूह आहे. पश्चिम्sढकडे असलेले जीव आशियाई असून यात गेंडा, हत्ती, वाघ आणि कडफोडवा यासारखे पक्षी आहेत. तर रेषेच्या दुसऱ्या बाजूला यापैकी कुणीच दिसून येत नाही. म्हणजे येथील प्राणी दुसऱ्या हिस्स्यापेक्षा वेगळे आहेत. येथील इकोलॉजी अत्यंत वेगळी आहे. येथे तुम्हाला मर्स्युपिल मॅम्मल, कोमोडो ड्रॅगन्स, कोकाटूस यासारखे प्राणी आढळतात. वैज्ञानिक याला बायोजियोग्राफिक बाउंड्री संबोधितात. म्हणजेच जैवविधतेच्या दोन अशा भागांचे मिलन जे एकदम वेगळे आणि अत्यंत अनोखे आहेत. या वालेस लाइनचा प्रभाव येथे अत्यंत जवळून जाणवतो.

Advertisement

कुणी लावला शोध?

या रेषेला सर्वप्रथम 1859 मध्ये ब्रिटिश न्युट्रालिस्ट अल्फ्रेड रसेल वालेस यांनी शोधले होते. त्यांनी चार्ल्स डार्विन सोबत स्वतंत्रपणे नैसर्गिक निवडद्वारे थियरी ऑफ इव्होल्युशन सादर केली होती. परंतु या रेषेला ही नाव इंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ टी.एच. हक्स्ले यांनी दिले होते. या शोधामुळे त्यांना फादर ऑफ बायोजियोग्राफी म्हणून ओळख मिळाली होती. वालेस जेव्हा या मलय बेटसमुहाचा प्रवास करत होते, तेव्हा येथील सर्व बेटांना त्यांनी भेट दिली आहे. येथे असलेल्या सर्व प्रकारच्या प्रजातींना जाणून घेतले, तर बालीच्या लोम्बोकच्या दिशेने ते गेल्यावर त्यांना काहीतरी विचित्र जाणवले. दोन्ही बेटांना एकच प्रवाह वेगळा करत असला अतरीही दोन्हीकडचे प्राणी अत्यंत वेगळे होते. पक्ष्यांनी त्यांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. जावा आणि बालीमध्ये पक्ष्यांच्या ज्या प्रजाती होत्या, या लामबोक येथून गायब होत्या. हाच प्रकार सस्तन आणि किटकांच्या बाबतीत होता. जे मासे लोमोबक बेटाच्या किनाऱ्यांवर आढळून येतात, ते बालीमध्ये आढळून येणाऱ्या माशांपेक्षा अत्यंत वेगळे अहेत. म्हणजेच केवळ 35 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या बेटांमध्ये मोठ्या खंडांइतका फरक होता. वालेस यांनी येथील बायोजियोग्राफिन डिस्ट्रिब्युशन जाणले होते.

रहस्यमय रेषा

वालेस यांच्यानुसार बाली आणि लोम्बोक बेटचे लोकेशन किंवा जियोग्राफी पूर्वी अशी नव्तही. बाली बेट पूर्वी आशियाशी जोडलेले असेल आणि लोम्बाक बेट ऑस्ट्रेलियाशी. याचमुळे आता येथे बायोजियोग्राफिक डिस्ट्रिब्युशन दिसून येत आहे. वालेस यांच्या थिअरीला प्रारंभी कुणीच मान्य केले नव्हेत. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर 1960 मध्ये प्लेट टेक्टॉनिक्सला मान्यता मिळाली. तेव्हा वालेस यांची थिअरी योग्य असल्याचे स्पष्ट झाले. बालीचा भाग पूर्वी आशियाशी जोडलेला होता आणि लोम्बाक ऑस्ट्रेलियाचा हिस्सा होता. दक्षिणेत अंटार्क्टिकापासुन तुटून ऑस्ट्रेलियन प्लेट हळूहळू उत्तरेच्या दिशेन सरकली आणि यामुळे वालेस लाईन निर्माण झाली.

Advertisement
Tags :

.