जगातील सर्वात जुनी बँकिंग सिस्टीम
700 वर्षांपूर्वी किल्ल्यांमध्ये तयार केले जायचे लॉकर
जगभरात आता बँकांमध्ये खातं असणे जवळपास आवश्यक ठरले आहे. बँकेत पैसे जमा करणे, लॉकरमध्ये सोने-चांदी ठेवण्याचे काम केले जाते. परंतु पूर्वीच्या काळात लोक पैसे कुठे ठेवायचे याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक बँकिंग, एटीएम, वॉल्ट आणि डिजिटल लॉकरची कल्पनाही नव्हती, तेव्हा मोरक्कोच्या अमेजीग लोकांनी 700 वर्षांपूर्वी अशी एक सिस्टीम तयार केली होती, जी आजही इंजिनियरिंग आणि विश्वासाची कमाल मानली जाते. इगौदार असे या सिस्टीमचे नाव आहे, यात दगड, माती आणि लाकडाने निर्मित मजबूत सामुदायिक भांडार किल्ले होते, ज्यांना जगातील सर्वात जुनी कम्युनिटी बँकिंग सिस्टीम म्हटले जाते.
धान्याचीही साठवणूक
एंटी एटलस पर्वतांच्या खडकांदरम्यान लपलेले हे इगौदार सुमारे 12 व्या ते 15 व्या शतकाच्या आसपास निर्माण करण्यात आले होते. अमेजगी समुदाय त्यांना केवळ धान्य ठेवण्यासाठी नव्हे, तर सोने, चांदी, दागिने, शस्त्रs, कपडे, तेल, खजूर आणि महत्त्वपूर्ण कायदेसशीर दस्तऐवजांच्या सुरक्षेसाठी वापरत होता. प्रत्येक परिवाराचा स्वत:चा वेगळा लॉक चेम्बर होता, ज्याचे टाळे लाकडाने निर्मित होते. हे टाळे इतके सुरक्षित होते, की आजही त्याचे सिद्धांत आधुनिक टाळ्यांशी मिळतेजुळते आहेत.
कीपरकडे व्यवस्थापन
इगौदारचे व्यवस्थापन एक विश्वसनीय व्यक्ती करायचा, ज्याला कीपर किंवा एमिन म्हटले जात होते. हा व्यक्ती बँक व्यवस्थापकाप्रमाणे काम करत होता. परिवारांच्या चाव्या त्याच्याकडेच असायच्या आणि त्याच्या अनुमतीशिवाय कुणीच चेम्बर उघडू शकत नव्हता. ही सिस्टीम केवळ सुरक्षा नव्हे, तर पूर्ण समुदायाच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेचे केंद्र होते. येथे बैठका व्हायच्या, व्यापार व्हायचा आणि वादांवर तोडगाही काढला जात होता.
आजही अत्यंत मजबूत
इगौदारांपैकी सर्वात प्रसिद्ध आणि जुने अगादिर इमचगुइगुइलिन आजही अस्तित्वात आहे. हे जवळपास 13 व्या शतकातील मानले जाते. यात 130 हून अधिक चेंबर आहेत. एक मशिद, मध्यवर्ती चौक आणि मजबूत भिंती आहेत. युद्धाच्या काळात हा किल्ला पूर्ण गावातील लोक आणि त्यांच्या सामानाचे रक्षण करत होता. पर्वताच्या शिखरावर निर्मित या किल्ल्यांच्या भिंती इतक्या जाड अन् मजबूत असायच्या की शत्रूंना त्या सहजपणे तोडता येत नव्हत्या. इंजिनियरिंगच्या दृष्टीकोनातून हे इगैदार कमालीचे होते. माती, दगड आणि पाम ट्रीच्या लाकडाने निर्मित हो गोदाम नैसर्गिक स्वरुपात तापमान नियंत्रित ठेवत होते. उष्णता आणि आर्द्रतेने धान्य खराब होत नव्हते. आजच्या काळातही हे शाश्वत आर्किटेक्चरचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
प्राचीन बँकिंग सिस्टीम
प्रत्येक परिवार स्वत:चे सामान सुरक्षित ठेवण्यासाठी शुल्क किंवा हिस्सा द्यायचा. चोरी किंवा लूटच्या स्थितीत पूर्ण समुदाय सुरक्षेत सामील व्हायचा. कायदेशीर दस्तऐवज येथे ठेवले जायचे, जे वादांमध्ये पुराव्यांचे काम करत होते. काही इगौदार इतके मोठे होते, की पूर्ण गावाच्या गरजा पूर्ण करू शकत होते. ऐतिहासिक स्वरुपात इगौदार अमेजीग संस्कृतीचा कणा होते. युरोपमध्ये आधुनिक बँकिंग सिस्टीम विकसित होण्याच्या शतकांपूर्वी येथे विश्वास आधारित सामुदायिक बँकिंग बहरत होती. आजही काही इगौदार वापरात आहेत किंर्व पर्यटकांसाठी संरक्षित आहेत.