For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगातील सर्वात अनोखा ब्रिज

06:49 AM Apr 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
जगातील सर्वात अनोखा ब्रिज
Advertisement

ब्रिजवर घरांची निर्मिती, दुकानांमध्ये असते लोकांची गर्दी

Advertisement

केवळ ये-जा करण्यासाठी वापर न होणाऱ्या एका ब्रिजवर लोक राहतात, दुकाने चालवितात आणि दैनंदिन जीवन जगत असतात. जर्मनीच्या थ्यूरिंगिया प्रांताच्या एर्फर्ट शहरातील व्रेमरब्रुके किंवा मर्चंट्स ब्रिजची सध्या चर्चा होत आहे. हा जगातील सर्वात अनोखा ब्रिज आहे. हा मध्ययुगीन दगडाचा आर्क ब्रिज असून तो गेरा नदीची उपनदी ब्रेइटस्टॉर्मवर उभारण्यात आला आहे. हा ब्रिज बेनेडिक्ट्सप्लाट्ज आणि वेनिगेमार्क्ट या दोन्ही काठांना जोडतो.

या पूलावर 32 आकर्षक हाफ-टिम्बर्ड घरे निर्माण करण्यात आली आहेत. ज्यात ग्राउंड फ्लोरवर दुकाने आणि वर राहण्याची जागा आहे. सुमारे 80 लोक येथे राहतात आणि दुकानांमध्ये नेहमी पर्यटकांची गर्दी असते. या ब्रिजची सुरुवात 12 व्या शतकात लाकडाच्या रुपात झाली होती, हा ब्रिज व्हाया रेजिया व्यापारी मार्गाचा हिस्सा होता. वांरवार आग लागल्यामुळे 1325 मध्ये या ब्रिजला मजबूत दगडाने पुन्हा उभारण्यात आले होते. 1472 मध्ये एका मोठ्या आगीने शहराच्या निम्म्या हिस्स्याला उद्ध्वस्त केले होते. तेव्हा ब्रिजवरील स्टॉल्स जळाली होती. यानंतर 1486 मध्ये दान्ही बाजूला हाफ-टिम्बर्ड घरे निर्माण करण्यात आली. प्रारंभी 62 चिंचोळी घरे होती, जे नंतर मर्ज होऊन आता 32 राहिली आहेत. ही तीनमजली घरे 13-15 मीटर उंच आहेत. या पूलाची रुंदी 26 मीटर असून ज्यात मध्ये 5.5 मीटर रुंदकोबलस्टोन मार्ग आहे, घर पूलाच्या आर्क्सवर लाकडाच्या सहाय्याने टांगलेली आहेत, ज्याद्वारे ती ओव्हरहँग करतात.

Advertisement

अत्यंत प्रसिद्ध बाजार

मध्ययुगात येथे महाग सामग्री विकली जात होती, ज्यात ओरिएंटल मसाले, सिल्क, सोने-चांदी, कागद, अगरबत्ती आणि दूरवरून आलेली सामग्री सामील होती. एर्फर्ट वोड (निळा डाय) साठी प्रसिद्ध होता, जो येथून पूर्ण युरोपमध्ये जात होता. 16 व्या-17 व्या शतकात खेळणी तयार करणारे कारागिर, फरियर, लेदर टॅनर्स यासारखे क्राफ्ट्समॅन येथे स्थायिक झाले. आजही तळमजल्यावर आर्टिसन वर्कशॉप्स, एंटीक शॉप्स, वाइन मर्चंट्स, आर्ट गॅलरी, कॅफे आणि स्पेशलफूड आउटलेट्स आहेत. तर वर खासगी निवासस्थाने आहेत, शहर कौन्सिलकडे बहुतांश घरे असून भाड्यावर अनोख्या बिझनेस आयडिया असलेल्या क्रिएटिव्ह लोकांना ती मिळतात. हा ब्रिज 125 मीटर लांब असून युरोपमध्sय सातत्याने निर्माण झालेल्या पुलांमध्ये सर्वात लांब आहे.

Advertisement
Tags :

.