जगातील सर्वात मोठं वांग
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये दरदिनी कुठला न कुठला विक्रम नोंदविला जात असतो. परंतु यावेळी कुठल्याही व्यक्तीच्या नव्हे तर एका वांग्याच्या नावावर विक्रम नोंद झाला आहे. डेव बेनेट नावाच्या व्यक्तीने 200-400 ग्रॅम नव्हे तर 3.77 किलोग्रॅमचे वांगं पिकविले आहे. इन्स्टाग्रामवर याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बहुतांश वांगी 150-200 ग्रॅम वजनाची असतात, अनेकदा त्याहूनही छोटी असतात. वांगी अनेक प्रकारची असतात, परंतु आकारात सर्व जवळपास एकसारखीच असतात. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर या वांग्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अमेरिकेत राहणारे डेव यांनी एप्रिल महिन्यात या वांग्याची पिक घेतले होते. रिकॉर्ड कीपरवरही याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या वतीने एक वक्तव्य जारी करण्यात आले आहे.
एप्रिलच्या प्रारंभी डेव बेनेट यांच्याकडून पिकविण्यात आलेला रिकॉर्ड-सेटिंग ग्लोब वांगी जे स्वत:च्या गोल आणि मोठ्या फळासाठी ओळखले जाते, ते 31 जुलै रोजी ब्लूमफील्ड, आयोवामध्ये मिळविण्यात आले असे यात नमूद आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा व्हिडिओ तर अत्यंत अधिक पसंत केला जात आहे. डेव बेनेटकडून पिकविण्यात आलेली सर्वात मोठी वांगी 3.778 किलोग्रॅम वजनाची असल्याचे यात म्हटले गेले आहे. या व्हिडिओला इन्स्टाग्राम हँडलवरही शेअर करण्यात आले आहे. अनेक युजर्स यावर कॉमेंट्स करत आहेत. हा तर खरोखरच विक्रम असल्याचे एका युजरने नमूद केले आहे. तर दुसऱ्या युजरने असे घडू शकते का असा प्रश्न विचारला आहे.