जग उलथापालथीच्या काळाला सामोरे जातेय
जागतिक संकटावर जयशंकर यांचा इशारा : आता एकत्र वाटचाल करण्याची वेळ
विदेशमंत्री एस. जयशंकर सध्या फिलिपाईन्सची राजधानी मनीलाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी क्वाड समुहाच्या बैठकीसोबत आशियान संघटनेच्या अंतर्गत आयोजित वेगवेगळ्या चर्चांमध्ये भाग घतेला आहे. याचदरम्यान त्यांनी जागतिक सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करत जग सध्या अत्यंत ‘उलथापालथी“च्या काळाला सामोरे जात असल्याची टिप्पणी केली आहे.
वृत्तसंस्था, मनिला
कुठलाही एक देश किंवा एक समूह या संकटांना सामोरे जाऊ शकत नाही ही गोष्ट आता पूर्णपणे स्पष्ट झाली आहे. ही स्थिती भारत आणि आसियान दरम्यान दृढ सहकार्याची आवश्यकता आहे. नेविगेटिंग अवर फ्यूचर टुगेदर विषय आज ही भावना दाखवत आहे, तिची आमच्यापैकी अनेक जणांना जाणीव असल्याचे उद्गार जयशंकर यांनी ‘भारत-आसियान पोस्ट-मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स 2026“मध्ये स्वत:च्या संबोधनादरम्यान काढले आहेत.
जागतिक परिस्थिती पाहता ऊर्जा, अन्नधान्य आणि आरोग्य सुरक्षेला कमी लेखले जाऊ शकत नाही. सध्या जग सागरी व्यापारावर मोठ्या प्रमाणात निर्भर आहे. याचमुळे सागरी मार्ग चिंतेचे मोठे कारण ठरू शकतात. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. योगायोगाने 2026 हे ‘आसियान-भारत सागरी सहकार्य वर्ष“ घोषित करण्यात आले आहे. हा पुढाकार एक सुरक्षित आणि स्थिर भविष्याच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
सहकार्य आवश्यक
जोखिम घटविणे आणि विविधता आणण्यासाठी दृढ सहकार्य हाच एकमात्र मार्ग आहे. सध्या भारत आणि आसियानचा अजेंडा व्यापक झाला असून यात व्यापार, गुंतवणूक, प्रतिभेला वाव, तंत्रज्ञान, डिजिटल आणि एआय सामील आहे. याचबरोबर हरित ऊर्जा आणि संपर्कव्यवस्थेवरही वेगाने काम होत असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले.
विदेशराज्यमंत्री किर्गिस्तान दौऱ्यावर
विदेशराज्यमंत्री कीर्ति वर्धन सिंह हे गुरुवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) विदेशमंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी किर्गिस्तानच्या चोलपोन-अता शहरात पोहोचणार आहेत. ही बैठक बिश्केकमध्ये 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेच्या तयारीकरता आयोजित करण्यात येत आहे.
फिलिपाईन्सच्या भूमिकेचे कौतुक
भारत आणि आसियान दरम्यान रणनीतिक भागीदारीला आणखी मजबूत करण्यात फिलिपाईन्सच्या योगदानाचा उल्लेख जयशंकर यांनी स्वत:च्या संबोधनात केला आहे. त्यांनी देश समन्वयक म्हणून फिलिपाईन्सकडून पार पाडण्यात येणाऱ्या सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले आहे. मध्यपूर्वेतील युद्धादरम्यान जागतिक स्तरावर आर्थिक आणि भू-राजनयिक आव्हाने वेगाने वाढत असताना जयशंकर यांनी ही भूमिका मांडली आहे.
आसियान-भारत बैठक...
?ऊर्जा, अन्नधान्य अन् आरोग्य सुरक्षा विनाअट हमीप्राप्त नाही.
?सागरी व्यापाराच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन अनिवार्य.
?चालू वर्ष आसियान-भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून जाहीर.
?व्यापार, एआय, डिजिटल तंत्रज्ञान, हरित ऊर्जेत भागीदारी वाढणार.
?दृढ सहकार्याद्वारे व्यापारी जोखिमींना कमी करण्यात येणार