कुवैतमध्ये मिळालेल्या प्राचीन मूर्तीमुळे जग चकित
7 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर एलियन आल्याचा दावा
कुवैतमध्ये हजार वर्षे जुनी क्लेची मूर्ती सापडली असून त्याचा चेहरा एलियनप्रमाणे दिसतो. आता त्या काळातही एलियन पृथ्वीवर यायचे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही मूर्ती अनैसर्गिक स्वरुपाचा चेहरा असलेली असली तरीही अशा मूर्ती मेसोपोटामियामध्ये देखील मिळाल्या होत्या. या प्राचीन मूर्तीचे वय सुमारे 7 हजार वर्षे आहे. कुवैत आणि अरेबियन आखातात पहिल्यांदाच अशाप्रकारच्या चेहऱ्याची मूर्ती मिळाली आहे. ही छोटी परंतु अचूक नक्षीकाम असलेली क्लेची मूर्ती आहे. याचे डोळे लांब असून नाक चपटे आहे. तर कवटी लांब असून ती उत्तर कुवैतच्या बहरा-1 प्राचीन स्थळावरून हस्तगत झाली होती.
या भागात 2009 पासून उत्खनन सुरू आहे. बहरा-1 अरब खंडातील सर्वात जुनी नागरी वस्ती राहिली आहे. येथे सुमारे 5500 ते 4900 ख्रिस्तपूर्व काळापासून लोक राहिले होते. त्या काळात तेथे उबैद नावाचा समुदाय वास्तव्यास होता. हे लोक मेसोपोटामिया येथून आले होते. हा समुदाय स्वत:ची हस्तकला, मातीच्या भांड्यांच्या कारागिरीसाठी ओळखला जात होता.
बहरा-1 येथे उत्खनन करणारे पुरातत्व तज्ञ अग्निएस्का शिमजॅक यांनी उबैद मग नियोलिथिकसोबत मिळत गेले, म्हणजेच अरेबियन आखातातील नव्या समुदायासोबत सामावत गेल्याचे म्हटले आहे. हा प्रकार सुमारे 7 हजार वर्षे जुना असून या समुदायांच्या परस्पर मिश्रणामुळे त्यांची संस्कृतीही मिसळली गेली आणि मग सांस्कृतिक बदल घडून आला. या ठिकाणाहून दीड हजार प्राचीन वस्तू सापडल्या असून परंतु ही मूर्ती सर्वात वेगळी आणि अनोखी आहे. ही मेसोपोटामियन क्लेपासून तयार केलेली आहे. उबैद समुदायाच्या लोकांच्या या मूर्तींमध्ये अनेकदा सरड्याचे डोकं, पक्ष्याचे डोकं किंवा सापाचे डोकं असलेल्या मूर्ती मिळतात. परंतु पहिल्यांदाच एलियनचा चेहरा असलेली मूर्ती मिळाली असल्याचे शिमजॅक यांनी सांगितले.