For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कल्पाच्या शेवटी प्रकृतीपासून निर्माण झालेले जग पुन: प्रकृतीशी एकरूप होते

06:20 AM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
कल्पाच्या शेवटी प्रकृतीपासून निर्माण  झालेले जग पुन  प्रकृतीशी एकरूप होते
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

भगवंत म्हणाले, हे सर्व विश्व, त्यातील प्राणी माझे आश्रीत असल्याने माझ्यावर अवलंबून आहेत, त्यांचे भवितव्य माझ्या हातात आहे म्हणून ते माझ्याहून वेगळे नाहीत. ह्या अर्थाचा

आकाशात महा-वायु सदा सर्वत्र राहतो। माझ्यात सगळी भूते राहती जाण तू तशी ।। 6 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार, सर्वत्र संचार करणारा वायु आकाशाचे ठिकाणी नित्य स्थित आहे, कारण तो आकाशाचा आश्रीत आहे त्याप्रमाणे सर्व भूते भगवंतांची आश्रीत असल्याने ती त्यांच्या ठिकाणी स्थित आहेत. प्राणी माझ्या ठिकाणी आहेत अशी कल्पना केली तर आहेत असे वाटते पण जर कल्पना केली नाही तर तसा भास न होता सर्वत्र मीच आहे असे वाटते. म्हणून प्राणिमात्राचा भास आहे आणि नाही हे कल्पना करण्यावर अवलंबून आहे. कल्पना नष्ट झाली की तिच्याबरोबर भास नष्ट होतो व कल्पना केली की, तिच्याबरोबर उत्पन्न होतो. जर कल्पना करायचे बंद केले तर भूतांचे असणे व भूतांचे नसणे दोन्ही नाहीसे होईल. या ज्ञानाची जागृती ज्याला होईल त्याचा भगवंत आणि इतरेजन हे दोन आहेत असा गैरसमज नष्ट होईल. सामान्यपणे माणसे कल्पनारुपी झोपेत असतात म्हणून त्यांना समोरचे जग खरे वाटते. जो जागा असतो त्याला वस्तुस्थितीची जाणीव असते. सदैव जागे राहण्यासाठी मायेला जाणून घेणे आवश्यक आहे. भगवंत पुढील श्लोकात मायेबद्दल सांगत आहेत. ते अर्जुनाला म्हणाले, सर्व प्राणिमात्रांना मायाच उत्पन्न करते व तीच त्यांचा नाश करते. हे कौन्तेया, कल्पाच्याशेवटी माझ्या मायेप्रत सर्व भूते जातात. त्यांना पुन्हा दुसऱ्या कल्पाचे आरंभी मी निर्माण करतो.

Advertisement

कल्पांती निजवी भूते मी माझ्या प्रकृतीमधे । कल्पारंभी पुन्हा सारी मी चि जागवितो स्वये ।। 7 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, सातव्या अध्यायाच्या

पृथ्वी आप तसे तेज वायु आकाश पाचवे। मन बुद्धि अहंकार अशी प्रकृती अष्ट-धा ।।4 ।। ही झाली अपरा माझी दुसरी जाण ती परा । जीव-रूपे जिने सारे जग हे धरिले असे ।। 5 ।। ह्या दोन श्लोकात मायेच्या स्वरूपाबद्दल मी तुला सांगितले आहे. मायेलाच प्रकृती असे नाव आहे. तिचे दोन प्रकार आहेत. चौथ्या श्लोकात पहिल्या प्रकारची माया आठ घटकांनी मिळून तयार होते व मनुष्य ती नजरेने पाहू शकत असल्याने त्याला ती परकी वाटत नाही म्हणून तिला अपरा माया असे म्हणतात. दुसऱ्या प्रकारची माया ही नजरेला दिसत नसते म्हणून ती अव्यक्त असते तिला परामाया असे म्हणतात. जेव्हा ह्या विश्वाचा नाश होतो तेव्हा सर्व भूते ह्या परामायेत नाहीशी होतात. भगवंतांचे सांगणे आपल्याला समजावून देण्यासाठी माऊली अनेक उदाहरणे देत आहेत. विवरणात ते म्हणतात, पावसाळ्यात उगवलेले गवत उन्हाळ्यात बीजासहित जमिनीत गाडले जाते अथवा पावसाळा संपला की, ढग आकाशातून नाहीसे होतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.