महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शहरातील जलकुंभांचे काम अंतिम टप्यात

10:57 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सप्टेंबरमध्ये उद्घाटन शक्य : 24 तास पाणीप्रश्न लवकरच लागणार मार्गी : पाणी समस्या दूर करण्यासाठी जलकुंभ उपयुक्त

Advertisement

बेळगाव : शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या जलकुंभाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 9 पैकी 3 जलकुंभांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 6 जलकुंभांचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या सप्टेंबरमध्ये यांचे उद्घाटन होऊन वापरात येतील अशी माहिती एलअॅण्डटीकडून मिळाली आहे. मागील दोन-तीन वर्षापासून या जलकुंभाचे काम हाती घेण्यात आले होते. आता हे काम पूर्णत्वाकडे आले असून, शहरवासियांना लवकरच 24 तास पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी आशा आहे. शहरात पाणी समस्या गंभीर बनू लागली आहे. काही भागात आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत हे जलकुंभ आधार ठरणार आहेत. 24 तास पाणी योजनेसाठी या जलकुंभाचा वापर होणार आहे. त्यामुळे शहरातील पाणी समस्या दूर करण्यासाठी हे जलकुंभ उपयुक्त ठरणार आहेत.

Advertisement

पावसाळ्यानंतर सर्व जलकुंभ वापरणार 

शहरातील वडगाव, मृत्यूंजयनगर, उद्यमबाग, कलमेश्वरनगर, देवराज अर्स कॉलनी, कणबर्गी, कावेरीनगर, आणि गणेशपूर या ठिकाणी दोन जलकुंभ उभारण्यात आले आहेत. यापैकी वडगाव, मृत्यूंजयनगर आणि उद्यमबाग येथील जलकुंभांचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरीत जलकुंभांच्या अंतिम टप्प्यातील रंगरंगोटी आणि इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. पावसाळ्यानंतर हे सर्व जलकुंभ वापरात येणार आहेत.

पाणी साठवणूक महत्त्वाची

एलअॅण्डटी कंपनीकडून 24 तास पाणी पुरवठा योजनेंतर्गत या जलकुंभांचा विकास साधण्यात आला आहे. सद्यस्थितीत शहरातील आठ प्रभागामध्ये 24 तास पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र येत्या काळात शहरात 24 तास पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न होणार आहेत. यासाठी हे जलकुंभ आधार ठरणार आहेत. या जलकुंभाचा आराखडा 2020 मध्ये तयार झाला होता. मात्र प्रत्यक्षात सहा महिन्यानंतर त्या कामाला प्रारंभ झाला होता. मात्र काम पूर्ण होण्यास 2024 वर्ष उजाडले आहे. शहरातील 58 प्रभागांमध्ये 24 तास पाणी पुरवठ्यासाठी प्रथमत: पाणी साठवणूक महत्त्वाची आहे. यासाठीच जलकुंभांची निर्मिती करण्यात आली आहे. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्याप्रमाणात लोकसंख्येतही भर पडू लागली आहे. त्यामुळे दैनंदिन पाण्याचा वापरही वाढत असल्याने मागणीही वाढू लागली आहे. पाण्याच्या साठवणुकीसाठी हे जलकुंभ उभारले गेले आहेत. एलअॅण्डटीने 2025 पासून 24 तास पाणी पुरवठ्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तत्पूर्वी पाण्याचे नियोजन आणि साठवणुकीचे जलकुंभही पूर्ण होणे आवश्यक आहे.

जलकुंभाचे कामही अंतिम टप्यात 

शहरातील 9 ठिकाणी जलकुंभ उभारण्यात आले आहेत. यापैकी 3 जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहेत. उर्वरित जलकुंभाचे कामही अंतिम टप्यात आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जलकुंभांचे उद्घाटन होऊन वापरात येतील. त्याबरोबरा 24 तास पाणी पुरवठ्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.

-हार्दिक देसाई (एलअॅण्डटी व्यवस्थापक)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article