कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्राथमिक शिक्षक संघटनेचे कार्य कौतुकास्पद

03:54 PM Apr 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

राज्य उपाध्यक्ष म .ल. देसाई यांचे प्रतिपादन ; शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणगौरव सोहळा संपन्न

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमधून भविष्यात प्रशासकीय अधिकारी तयार व्हावेत यासाठी विविध स्पर्धा परीक्षेचे आयोजन करून मुलांच्या यशाचे कौतुक करणारी आणि प्रोत्साहन देणारी प्राथमिक शिक्षक संघटना देशपातळीवरील संघटनेची संलग्न राहून करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन राज्य उपाध्यक्ष तथा विश्व शब्दकोश मंडळाचे सदस्य म. ल. देसाई यांनी केले.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा सावंतवाडी सिंधुदुर्ग तसेच महिला सेलने आयोजित केलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेत टॉप टेन यादीतील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात म . ल. देसाई बोलत होते. यावेळी राजाराम कविटकर, विस्तार अधिकारी प्रमोद पावसकर, महिला सेल अध्यक्षा शुभेच्छा सावंत, जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे, जिल्हा महिला सेल अध्यक्ष संजना ठाकूर, सरचिटणीस जिल्हा महिला सेल सीमा पंडित, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, नरेंद्र सावंत, जिल्हा उपाध्यक्ष वळवी, अरुण माडगुत, भिवा सावंत, शिक्षक पतपेढी संचालक सुभाष सावंत, मृगाली पालव, महेश सावंत, संजय शेडगे, तालुका अध्यक्ष विजय गावडे सचिव रुपेश परब, नेहा सावंत, तेजस बांदिवडेकर, प्रसाद गावडे, संतोष गवस, भिकाजी गावडे, ज्ञानेश्वर सावंत, उज्वला गावडे, अर्चना देसाई, गुरुनाथ राऊळ, संदीप गवस, मनोहर गवस इत्यादी उपस्थित होते. यावेळी राजाराम कविटकर यांनी प्राथमिक शिक्षक संघटना शाखा सावंतवाडीचे शैक्षणिक, सामाजिक कार्य प्रेरणादायी असून आदर्शवत असल्याचे सांगितले. प्रमोद पावसकर यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन मिळवलेल्या यशाबद्दल प्रोत्साहन बक्षीस योजनेच्या कार्यात प्राथमिक शिक्षक संघटनेचे विशेष कौतुक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ही समाजाभिमुख संघटना असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने झटणारी आणि नीतीमूल्ये जोपासणारी अशा सर्वांना आदर्श ठरणाऱ्या प्राथमिक शिक्षक संघटनेचे कार्य गौरवास्पद आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन नेहमीच त्यांच्या पाठीशी राहणारी एकमेव संघटना म्हणून उल्लेख केला जातो. शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक बांधिलकी सांभाळून कोरोना सारख्या महाभयंकर स्थितीत अनेक घटकांपर्यंत पोहोचून वस्तू तसेच आर्थिक स्वरूपात मदतीचा हात देऊन प्राथमिक शिक्षक संघटनेने महत्त्वाची भूमिका सांभाळत माणुसकीचा धडा इतरांनाही दाखवून दिल्याचे सांगितले. यावेळी दि स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवॉर्ड ठरलेल्या टॉप टेन यादीतील वीरा घाडी ( सावंतवाडी 4), मानवी घाडी (सावंतवाडी 4), दुर्वा नाटेकर (बांदा 1), शिवराज राऊळ (सावंतवाडी 2), रिया सावंत ( इन्सुली 5 ), आराध्या परब (कोलगाव 2), चंद्रकांत गावकर (ओटवणे 4), पार्थ बोलके (सावंतवाडी 4), शंकर परब ( कारिवडे पेडवे), मेघना सावंत (माडखोल धवडकी) या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्राथमिक शिक्षक महिला कला मंच यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमात रंगत आणली. तर सृजनशीलतेचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या शिक्षकांनी आपल्या स्वयंस्फूर्तीने कलागुणांचा कलाविष्कार सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. या कलाविष्कारामध्ये महाराष्ट्राची लोकसंस्कृती लक्षवेधी ठरली. कार्यक्रमाचे नियोजन महेश पालव, सुरेंद्र विरनोडकर, नितीन सावंत, मंगेश देसाई, रोशन राऊत, बरागडे, संजय बांबुळकर, संतोष रावण, संदीप मेस्त्री, उदय सावळ, अमित टक्केकर, रवी गुरव, मिंगेल मान्येकर, बाबुराव पास्ते, श्रावणी सावंत, तेजस्विता वेंगुर्लेकर, नंदू कवठणकर, बापूशेठ कोरगावकर, बाबा गुरुजी, वंदना सावंत, सरस्वती गावडे, प्रणिता भोयर, राधिका परब, मनाली कोरगावकर, वैष्णवी फाले, श्रेया परब, भाग्यश्री राणे, दिपाली नेहारकर आदींसह तालुक्यातील शिक्षक व शिक्षिका यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सेल सचिव रोशनी राऊत सुत्रसंचालन मनोहर परब आणि निता सावंत यानी तर आभार दीपक राऊळ यांनी मानले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article