महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या नूतन कार्यकारिणीच्या कार्यास प्रारंभ

10:03 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव :  बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणीने पदभार स्विकारला असून यावर्षी आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरविण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील हे होते. रसवंतीगृह येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष सुधीर बिर्जे, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव जोतिबा उंदरे, खजिनदार ए. जी मंतुर्गी यांनी आपला पदभार स्वीकारला. कर्नाटक केसरी प्रकाश मुधोळ व कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. माजी अध्यक्ष विश्वनाथ पाटील व उपाध्यक्ष अपय्या आप्पण्णवर यांचेही स्वागत करून त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी नूतन अध्यक्ष सुधीर बिर्जे म्हणाले, सर्वांच्या सहकार्याने लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान बेळगावच्या आनंदवाडीच्या आखाड्यात आयोजित करण्यात येणार आहे. कुस्तीची परंपरा बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेने जिवंत ठेवली आहे. यापुढेही ही परंपरा आपण जिवंत ठेऊ. यावर्षीपासून महिला कुस्तीपटूना प्रोत्साहन देण्यासाठी  महिला कुस्त्यांचे  आयोजनही करण्यात येणार आहे.  यावेळी चेतन बुद्धण्णवर, बाहुबली पाटील, अभिजीत पाटील, सुहास पाटील तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article