For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंबोली घाटात कोसळलेला दगड हटविण्याचे काम सुरु

12:23 PM Jul 17, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आंबोली घाटात कोसळलेला दगड हटविण्याचे काम सुरु
Advertisement

आंबोली । वार्ताहर

Advertisement

आंबोली घाटात पूर्वी दरड कोसळलेल्या जागेपासून काही अंतरावर एक भला मोठा दगड आज थेट रस्त्यावर कोसळला. सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली. वाहन चालकांनी याबाबतची माहिती आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई यांना दिली. त्यानंतर त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली. सध्या जेसीबीच्या सहाय्याने हा दगड हटविण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेवेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. सद्यस्थितित या भागातून एकेरी वाहतूक सुरू असल्याची माहिती दत्तात्रय देसाई यांनी दिली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.