महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वडगाव- जुने बेळगाव येथील तलावांचे काम अर्धवट स्थितीत

11:18 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

परिसरातील नागरिकांना धोका : कंत्राटदाराला सूचना

Advertisement

बेळगाव : वडगाव व जुने बेळगाव येथील तलावांचे काम अर्धवट स्थितीत असल्याने परिसरातील नागरिकांना धोकादायक ठरत आहे. मागील तीन महिन्यात तलावांच्या अर्धवट बांधकामांमुळे तिघा जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे या कामाला त्वरित सुरुवात करावी, अशी मागणी श्रीरामसेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर यांनी कंत्राटदाराकडे केली. मंगाईनगर वडगाव येथे दोन तर कलमेश्वर मंदिर, जुने बेळगाव येथील एक तलाव अर्धवट स्थितीत आहे. कंत्राटदारांनी काम अर्धवट ठेवल्याने परिसरातील नागरिकांना तलाव धोकादायक ठरत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. संरक्षण भिंत नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होत असल्याने रमाकांत कोंडुसकर यांनी या परिसराची पाहणी केली होती. त्यामुळे कंत्राटदारांना तात्काळ बोलावून काम सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article