For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाट्य महोत्सवातून बाल कलाकार घडवण्याचे कार्य कौतुकास्पद

12:04 PM Feb 21, 2026 IST | अनुजा कुडतरकर
नाट्य महोत्सवातून बाल कलाकार घडवण्याचे कार्य कौतुकास्पद
Advertisement

युवानेते विशाल परब यांचे प्रतिपादन ; सावंतवाडीत कै.दिनकर धारणकर स्मृती नाट्य महोत्सव

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाट्य व सांस्कृतिक चळवळ व्यापकतेने पुढे जाणे आवश्यक आहे त्यासाठी सावंतवाडीत येत्या एप्रिल महिन्यात भव्य दिव्य असे नाटक आयोजित केले जाईल .सावंतवाडी येथील क्षितिज इव्हेंट व सावंतवाडी नगरपालिका यांनी बालनाट्य महोत्सव आयोजित करून बाल कलाकार घडवण्याचे हे कार्य कौतुकास्पद आहे. पुढील वर्षी दर्जेदार आणि संपूर्ण सिंधुदुर्गवासीय या बालनाट्य महोत्सवाला हजेरी लावतील असा बाल नाट्यमहोत्सव सावंतवाडीत सर्वांच्या सहकार्याने होईल त्यासाठी आपण पुढाकार घेईन असे भाजपचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी नगरपालिका आणि क्षितिज इव्हेंट सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कै.दिनकर धारणकर स्मृती नाट्य महोत्सव शुक्रवार 20 फेब्रुवारी ते रविवार 22 फेब्रुवारी या तीन दिवसीय कालावधीत सावंतवाडी येथील बॅ ना थ पै सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या नाट्यमहोत्सवाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव तथा संवाद तरुण भारतचे सावंतवाडी प्रतिनिधी ॲड .संतोष सावंत, नगरपालिका महिला, बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेवक ॲड.सिद्धार्थ भांबुरे, क्षितिज इव्हेंटचे बाळ पुराणिक, सचिव लक्ष्मण नाईक, नगरसेविका सौ .नीलम नाईक ,सुनिता पेडणेकर,खजिनदार हर्षवर्धन धारणकर आधी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी श्री परब पुढे म्हणाले .सावंतवाडीत सांस्कृतिक व नाट्य चळवळ पुढे नेण्याचे काम केले जात आहे. कै.दिनकर धारणकर यांची नाट्य विचारांची चळवळ पुढे जाणे आवश्यक आहे . क्षितिज इव्हेंट आणि सावंतवाडी नगरपालिका यांनी बाल नाट्य महोत्सव आयोजित करून खऱ्या अर्थाने बालकलाकार घडवण्याचे कार्य केले आहे. सावंतवाडीत सांस्कृतिक व नाट्य चळवळ अधिक गतीने पुढे जाणे आवश्यक आहे . त्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेच्या सहकार्यातून येथे एप्रिलमध्ये एक भव्य दिव्य असे नाटक आयोजित करण्यात येईल . पुढील वर्षी क्षितिज इव्हेंटचा हा बालनाट्य महोत्सव जिल्हास्तरीय महोत्सव म्हणून आयोजित करावा त्याला आपण निश्चितपणे सहकार्य करीन असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी क्षितिज इव्हेंचे अध्यक्ष बाळपुराणिक म्हणाले स्व. दिनकर धारणकर यांनी सावंतवाडी बाल नाट्य चळवळ सुरू केली.आज ही नाट्य चळवळ अधिक गतीने पुढे जावी यासाठी क्षितिजि इव्हेंटच्या माध्यमातून आमचे प्रयत्न आहेत. बालकलाकारांना व्यासपीठ मिळवून देऊन पुढील काळातील नाट्य चळवळ अधिक व्यापकतेने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. संगीत नाट्य चळवळही संपूर्ण महाराष्ट्रात नेण्याचा आमचा प्रयत्न आहे .त्यासाठी पाच संगीत नाटके आम्ही रंगमंचावर आणत आहोत. त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत असे ते म्हणाले. यावेळी नगरसेवक ॲड .सिद्धार्थ भांबुरे व सुरेश पुराणिक,हर्षवर्धन धारणकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रास्ताविक सचिव लक्ष्मण नाईक यांनी केले. ते म्हणाले बाल नाट्य महोत्सव आम्ही घेतला आहे मात्र प्रेषक वर्गांची म्हणावी तशी साथ मिळत नाही . सावंतवाडीकरांनी नाट्य चळवळ व्यापकतेने पुढे नेण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी क्षितिज इव्हेंटतर्फे अध्यक्ष बाळा पुराणिक यांच्या हस्ते भाजपचे युवा नेते विशाल परब , संवाद तरुण भारतचे पत्रकार ॲड. संतोष सावंत, ॲड सिद्धार्थ भांबुरे ,दिपाली भालेकर ,नीलम नाईक ,सुनिता पेडणेकर ,सत्यजित धारणकर, सुरेश पुराणिक ,विनायक गावस ,रावजी पारसेकर, संजय नाईक ,रुपेश राऊळ,बालनाट्य लेखिका आज्ञा कोयंडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी घाटे यांनी केले. यावेळी गणेश दीक्षित, संदीप धुरी, उमा जडये ,सृष्टी पेडणेकर ,राजेश जाधव ,सहसचिव सिद्धार्थ नेरुरकर ,उपाध्यक्ष गुरुप्रसाद चिटणीस,श्री चिपळूणकर,रामचंद्र मोरे संतोष गावडे ,ज्ञानेश्वर पाटकर, तेजस प्रभूदेसाई ,वैभवी पुराणे ,गणेश प्रसाद गोगटे आदी उपस्थित होते. शुक्रवारी पहिल्या दिवशी देवगड येथील बालनाट्य ''लगोरी'' व नेरूर येथील एकांकिका ''देवराई'' हे नाटक सादर करण्यात आले. तर शनिवार 21 फेब्रुवारीला 'संगीत होनाजी बाळा' व रविवार 22 फेब्रुवारीला ' वीज म्हणाली धरतीला' हे नाटक सादर होणार आहे .

Advertisement

Advertisement
Tags :

.