For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीश्रीश्रींचे कार्य प्रेरणादायी!

04:27 PM May 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्रीश्रीश्रींचे कार्य प्रेरणादायी
Advertisement

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’आश्रमास भेट

Advertisement

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी कर्नाटकातील बेंगळुरू येथील गुऊदेव श्रीश्रीश्री रवीशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आश्रमास भेट दिली. त्यावेळी त्यांनी तेथे आयोजित वैदिक पूजन आणि नंतर सायंकाळी आध्यात्मिक सत्संगात सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी, आश्रमातील आध्यात्मिक वातावरण, भारतीय संस्कृतीमधील शाश्वत परंपरा आणि मानवी मूल्ये, तसेच लोककल्याणाचा संदेश आणि जागतिक शांततेसाठी चाललेले त्यांचे कार्य लाखो लोकांना प्रेरणादायक असल्याचे सांगितले. अशा सकारात्मक वातावरणात मानसिक शांती, आत्मविस्वास आणि आंतरिक शक्ती प्राप्त होते, असेही डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.

भारताच्या प्राचीन आध्यात्मिक  परंपरेचे संरक्षण आणि प्रसारासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे कार्य महत्वपूर्ण असल्याचेही  ते म्हणाले. तणावरहित जीवनशैली, युवक सक्षमीकरण, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक परिवर्तन या क्षेत्रात फाऊंडेशनने मोठे योगदान दिले असून समाजात सकारात्मकता आणि शांततेचा संदेश पोहोचविण्यात संस्थेची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रशंसोद्गार डॉ. सावंत यांनी काढले. या भेटीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी गुऊदेवांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘लव्ह मुव्हीज द वर्ल्ड’ हा लघुपट आणि ‘इंट्यूशन प्रोसेस’ या उपक्रमाचे सादरीकरण पाहिले. त्याद्वारे गुऊदेवांचे मानवतावादी कार्य, सामाजिक बांधिलकी आणि जागतिक स्तरावरील उपक्रमांचे दर्शन घडविण्यात आले आहे.

Advertisement

श्रीश्रीश्री रविशंकरना मुख्यमंत्र्यांचे भारी कौतुक !

श्रीश्रीश्री रविशंकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कौतुक केले. ते म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्याकडचा एक अत्यंत महत्त्वाचा गुण असा आहे की त्यामुळे त्यांच्याकडे कोणी शत्रू नाही. गोव्यात मोर्चे असो, आंदोलने असो, जे सरकारच्या विरोधात असतात अशावेळी मुख्यमंत्री स्वत:च त्या आंदोलकांना भेटण्यासाठी जातात. त्यांच्यामध्ये जाऊन बसतात. त्यांच्याशी चर्चा करतात. परिणामी आंदोलनकर्त्यांच्या मनात असलेले विचार नाहीसे होतात आणि ती मंडळी देखील मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतात. आणि त्यांच्या मनात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात असलेले विचार देखील संपुष्टात येतात. मग विरोधकांची अशी धांदल होते की या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात करायचे तरी काय ! आम्ही जेव्हा त्यांच्या विरोधात घोषणा देतो त्यावेळी ते आम्हाला येऊन भेटतात, आमच्याशी संवाद साधतात. त्यामुळे त्यांना विरोध करण्यासाठी आता विरोधकांना काहीतरी वेगळेच धोरण स्वीकारावे लागेल, असे निवेदन करून रविशंकर जोरजोरात हसले. आपले प्रयत्न असेच राहू द्या.गोव्याला नेहमीच प्रगतीपथावर न्या. आपणही लवकरच गोव्याला भेट देण्यासाठी येईन, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.