For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काळी पडली महिलेच्या हातापायांची बोटं

06:46 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
काळी पडली महिलेच्या हातापायांची बोटं
Advertisement

शरीरापासून वेगळे करावे लागले अवयव

Advertisement

वैद्यकीय शास्त्रात कधीकधी छोटासा आजारही जीवघेणा ठरू शकतो. ब्रिटनच्या वेल्समधील स्वानसी शहरात राहणारी 48 वर्षीय लुईस मार्शलसेसोबत असेच घडले आहे. एका किडनीस्टोनने तिचे पूर्ण जीवनच बदलून टाकले आहे. लुईसला अचानक स्वत:च्या शरीराच्या एका हिस्स्यात तीव्र टोचल्यासारखे जाणवू लागले. तिने याला सामान्य किडनीस्टोनचा त्रास मानले. परंतु काही तासात ही समस्या इतकी गंभीर झाली की तिला स्वत:च्या हातांच्या आणि पायांची सर्व बोटं गमवावी लागली.

जुलै 2022 मध्ये  लुईसला जेव्हा वेदना झाल्या, तेव्हा ती त्वरित रुग्णालयात पोहोचली. डॉक्टरांनी किडनीस्टोनचे निदान करत तिला घरी जाण्याचा सल्ला दिला. परंतु त्या रात्री तिची प्रकृती बिघडू लागली आणि ती वारंवार बेशुद्ध पडू लागली. तिला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आल्यावर तपासणीत तिला ‘सेप्टिक शॉक’ लागल्याचे कळले. तिच्या शरीराच्या महत्त्वपूर्ण अवयवांना वाचविण्यासाठी डॉक्टरांना अवयवातील रक्तप्रवाह रोखावा लागला, यामुळे तिचे हात अन् पाय बर्फासारखे थंड पडले आणि काळ्या रंगाचे होऊ लागले. लुईससाठी हा सर्वात भीतीदायक क्षण होता. शुद्धीत आल्यावर स्वत:ची बोटं काम करत नसल्याचे तिला जाणवले. मी शस्त्रक्रियेदरम्यान शुद्धीत होते आणि माझ्या बोटांना स्वत:च्या शरीरापासून वेगळे होताना पाहिले, हा प्रकार एखाद्या हॉररपटासारखा होता असे ती सांगते. ऑक्टोबर 2022 पर्यंत तिचे दोन्ही हात आणि पायांची सर्व बोटं कापण्यात आली.

Advertisement

या संकटानंतर चालणे-फिरणे, स्वयंपाक किंवा स्नान यासारख्या मूलभुत कामांसाठी देखील ती स्वत:च्या आईवडिलांवर निर्भर झाली. परंतु या अवघडकाळात एक चमत्कारही झाला. लुईसला कृत्रिम अवयवांसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले. तेथे तिला स्वत:चा ‘हँड ट्विन’ मिळाला. एका तंत्रज्ञाचे हात आणि बोटं लुईसयच जुन्या छायाचित्रांप्रमाणे होते. याच्या मदतीने डॉक्टरांनी तिच्यासाठी असे प्रोस्थेटिक हात तयार केले जे अत्यंत खरे वाटतात. ज्यात नसांच्या निळ्या रेषा आणि त्वचेच्या खुणा देखील आहेत. लुईस आता स्वत:च्या नव्या नॉर्मल आयुष्याला सरावली आहे.

Advertisement
Tags :

.