For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

60 देशांची सैर करणारी महिला

03:10 PM Mar 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
60 देशांची सैर करणारी महिला
Advertisement

व्हेनेझुएलात सर्वात वाईट अनुभव आल्याची टिप्पणी

Advertisement

हिंडण्या-फिरण्याचे शौकीन लोक दरवेळी नव्या ठिकाणाला एक्सप्लोर करू इच्छितात. अनेकदा हा अनुभव आनंददायी असतो तर काही वेळा भीतीदायक देखील असतो. असेच एक प्रकरण न्यूयॉर्कमधून समोर आले आहे. जेथे गेराल्डिन जोआकिम नावाच्या महिलेने स्वत:चा अनुभव सांगितला आहे. गेराल्डिन दरवर्षी चारवेळा वेकेशनवर विदेशात जात होती. आतापर्यंत तिने स्वत:च्या छंदापोटी 60 देशांना एक्सप्लोर केले आहे. यादरम्यान तिचा अनुभव अत्यंत चांगला राहिला. परंतु एका देशात तिला मात्र अत्यंत वाईट अनुभव आला. गेराल्डिन मायक्रोनेशियाचे याप, ब्राझील, जपानचा ओकिनावा, रशिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, मोझाम्बिक, समवेत अनेक ठिकाणी जाऊन आली आहे. यातील केवळ एकाच ठिकाणी पुन्हा जाऊ इच्छिणार नाही. हे ठिकाण व्हेनेझुएलाची राजधानी काराकास आहे असे ती सांगते.

प्रवासादरम्यान हातात चाकू

Advertisement

व्हेनेझुएलाची राजधानी काराकासला जाणे माझ्यासाठी  सर्वात वाईट अनुभव होता. मी60 देशांची सैर करणारी महिला रात्री उशिरा फ्लाइटने तेथे पोहोचली. सर्वप्रथम मी कॅब बुक केली, जी अत्यंत उशिराने आली. त्या कॅबच्या पुढील सीटवर आणखी एक इसम बसला होता, मी सर्वसाधारणपणे दोन अनोळखींसोबत कारमध्ये बसत नाही. परंतु माझ्याकडे अन्य कुठलाच पर्याय नव्हता. 30 मिनिटांच्या प्रवासादरम्यान मी स्वत:च्या हँडबॅगेजमधून एक छोटा चाकू हातात पकडला होता. त्यानंतर हॉटेलमध्ये पोहोचले असता ते अत्यंत जीर्ण होते माझे सामान दरवाजासमोर ठेवले, जेणेकरून सहजपणे कुणाला दरवाजा उघडता येऊ नये. रात्रभर मी अस्वस्थ असल्याने झोपू शकले नाही, असे गेराल्डिन सांगते.

विमानतळावरुन हँडबॅगची चोरी

यानंतर दुसऱ्या दिवशी टॅक्सीने विमानतळावर पोहोचले. त्याचे भाडे देत असतानाच कुणीतरी माझी बॅग हिसकावून पळू लागले. मी त्याच्या मागे पळत असताना त्या इसमाने अवैधमार्गाने त्वरित विमानतळात चेक-इन करविण्याची ऑफर दिली. त्या इसमाला काही पैसे दिले आणि फ्लाइटमध्ये चेक-इन केल्याचे गेराल्डिनने सांगितले.

काहीतरी वेगळे करण्याचा छंद

गेराल्डिन ही रेसिलियन्स वर्कशॉप्सवर काम करत आहे. जोआकिम यापूर्वी आंतरराष्ट्रीय विपणनाच्या क्षेत्रात काम करत होती. ती कामासाठी जगभरात फिरत होती. परंतु आता ती पूर्णपणे मनोरंजनासाठी फिरते. केवळ समुद्र किनाऱ्यावर बसणे अन् हॉटेलसमध्ये थांबण्यासाठी तेथे जात नाही. कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी असण्याची जाणीव मला आवडते. याचमुळे काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असते असे गेराल्डिनने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.