For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेकअप करणाऱ्या महिलेचाच सोन्यावर डल्ला

01:34 PM Feb 21, 2025 IST | Radhika Patil
मेकअप करणाऱ्या महिलेचाच सोन्यावर डल्ला
Advertisement

सातारा : 

Advertisement

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन चोरीचा गुन्हा उघड करुन 5 तोळे वजनाचे 4 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी आरती शहादेव केंगार (वय 19, रा. शनिवार पेठ सातारा) या महिलेला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नम्रता युवराज अडसुळ वय 38 रा. शाहूपुरी, सातारा यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे या गुह्याच्या घटनास्थळावर जावुन फिर्यादी नम्रता अडसुळ यांच्याकडून घटनेची माहिती घेतली असता बुधवारी घटनेच्या दिवशी अडसुळ यांच्या घरी मेकअप करण्याकरीता आरती केंगार ही महिला आली होती. या व्यतीरिक्त अडसूळ यांच्या घरी कोणीही आलेले नसल्याने या आरती केंगार हिच्यावर अधिकचा संशय असल्याने तिला पोलीस ठाण्यात बोलावुन घेवुन तिच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तर दिल्याने तिला या गुह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला विश्वासात घेवुन तिच्याकडे गुह्याचे अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता तिने या गुह्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

Advertisement

अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिला आरोपीला ताब्यात घेवुन तिच्याकडुन गुह्यामध्ये चोरीस गेलेले 5 तोळे वजनाचे 4 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करुन सोन्याचे दागिने चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, ज्योतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे व महिला पोलीस अंमलदार माधुरी शिंदे, पुनम करपे, गायत्री गुरव यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.