महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महिलेला आहे अजब सवय

07:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटत असतात. काही लोकांच्या सवयी तर अत्यंत विचित्र असतात. तर काही लोकांची पसंत-नापसंत कळल्यावर दंगच व्हायला होते. एका महिलेची खाण्याप्रकरणी पसंत ऐकून घेतल्यावर विश्वासच बसणार नाही. सर्वसाधारणपणे कुणाला गोड पदार्थ आवडतात, तर कुणाला तिखट आणि चटपटीत खायला आवडते. परंतु या महिलेला विटा, सिमेंट खाणे पसंत आहे. ती स्वत:च्या घराच्या भिंतींना पाहून स्वत:ला रोखू शकत नाही. लोकांच्या नजरांपासून वाचत ती प्लास्टर तोडून त्यातील सामग्री चमच्यात भरुन खात असते.

Advertisement

वयाच्या 15 व्या वर्षापासून सवय

Advertisement

39 वर्षीय पॅट्रिस बेंजामीन रॅमगूलम यांना सिमेंट अन् विटांचा चुरा खाण्याची सवय आहे. ही सवय शरीरासाठी घातक असल्याची त्यांना जाणीव आहे, तरीही त्या यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. सर्वप्रथम त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी प्लास्टर तोडून त्यामागे काय आहे जाणण्याचा प्रयत्न केला, याचदरम्यान त्यांनी सिमेंट अन् विटांचा चुरा खाल्ला, तो त्यांना आवडल्याने त्या वारंवार हा प्रकार करू लागल्या. या सामग्रीला कुठलीच चव नव्हती, तरीही त्यांना ही सवय सोडणे शक्य झाले नाही. पॅट्रिस यांनी स्वत:च्या शालेय मित्रासोबत विवाह केला. विवाहानंतर त्या स्वत:ची ही सवय लपवून ठेवत होत्या. परंतु अखेरीस एकेदिवशी त्यांच्या पतीने त्यांना सिमेंट खाताना पाहिले आणि त्याला धक्काच बसला. पॅट्रिस यांनी ही सवय सोडावी असे त्याने सांगितले आहे, परंतु याचा कुठलाच प्रभाव पडला नाही. डॉक्टरांनुसार याला पीका कंडिशन म्हटले जाते, ज्यात लोक खाण्यासाठी योग्य नसलेल्या गोष्टी खात असतात. डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचारानंतरही त्यांची ही सवय सुटू शकलेली नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article