महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘आवाजाच्या दुनिये’चा जादूगार हरपला

06:30 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचे निधन : 42 वर्षांपर्यंत सुपरहिट शोचे सूत्रसंचालन

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

रेडिओवरील शैलीदार आणि रसाळ निवेदनाने संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत ठरलेले ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांचे मंगळवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात निधन झाले आहे. निधनासमयी ते 91 वर्षांचे होते. सयानी यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अमीन यांनी ‘बहनों और भाईयो, अगली पायदान पें है ये गाना...’ असे म्हणत अनेक वर्षे रेडिओवर बिनाका गीतमाला सादर केली होती. अमीन सयानी यांनी केवळ निवेदन केले असे नाही तर अनेक गायक, गीतकार, संगीतकार यांना मुलाखतीच्या निमित्ताने बोलतं करून त्यांच्या गाण्यांचा सृजनशील प्रवास ध्वनिमुद्रित केला.

1932 मध्ये मुंबईत जन्मलेले अमीन सयानी यांनी इंग्रजी भाषेत उद्घोषक म्हणूक आकाशवाणीवर कारकिर्दीला सुरुवात केली होती. तर स्वातंत्र्यानंतर त्यांनी हिंदी भाषेत निवेदन करण्यास सुरुवात केली, स्वत:च्या गोड आवाजात अस्खलित हिंदी भाषेत निवेदन आणि गाण्यांचे किस्से ऐकवत बिनाका गीतमाला हा कार्यक्रम त्यांनी लोकप्रिय केला होता.

1952 ते 1994 इतका प्रदीर्घ काळ चाललेला लोकप्रिय कार्यक्रम म्हणून गीतमालाची नोंद झाली आहे. आवाजाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या गेलेल्या अमीन सयानी यांच्याइतकी अन्य कुठल्याही निवेदकाला लोकांचे प्रेम लाभले नाही.

‘बिनाका गीतमाला’चा उल्लेख झाला की अमीन सयानी हे नाव आपोआप समोर येते. ‘नमस्कार भाईयों और बहनो.. मै आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूँ...’ असे म्हणत 1952-94 या कालावधीत अमीन सयानी यांनी आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केले. 3 डिसेंबर 1952 रोजी ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रमाचे पहिले प्रक्षेपण झाले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला 7 गाणी प्रक्षेपित केली जात होती, ज्यांची संख्या नंतर 16 वर पोहोचली होती. अमीन सयानी यांचा शांत आणि सुमधूर आवाज श्रोत्यांच्या मनाला भिडत असे. तब्बल 42 वर्षे अमीन सयानी यांची बिनाका गीतमाला सुरु होती. मनोरंजनाची टीव्हीसारखी साधने सर्वसामान्यांना उपलब्ध झाल्याने हा कार्यक्रम बंद करण्यात आला होता. परंतु अमीन सयानींच्या आवाजाचे गारुड कायम राहिले.

30 मिनिटांचा रेडिओ शो, तीनदा नावात बदल

सयानी यांचा कार्यक्रम बिनाका गीतमाला प्रथम रेडिओ सिलोनवर प्रसारित व्हायचा. हा 30 मिनिटांचा कार्यक्रम होता. 1952 मध्ये सुरु झालेला हा कार्यक्रम  देशभरात लोकप्रिय ठरला. बिनाका गीतमालाचे नंतर सिबाका गीतमाला झाले आणि मग हिट परेड नावानेही कार्यक्रम प्रसारित झाला. परंतु कधीच याची लोकप्रियता कमी झाली नाही. यानंतर गीतमाला कार्यक्रम आकाशवाणी आणि विविध भारतीवरही प्रसारित झाला.

कार्यक्रमाचे असंख्य चाहते

गीतमाला कार्यक्रमाची प्रत्येक जण प्रतीक्षा करत असायचा. घर, दुकान, बाजार, प्रत्येक ठिकाणी लोक सयानी यांचा आवाज ऐकण्यासाठी आतूर असायचे. चार्ट-टॉपिंग हिट्सचा हा रेडिओ शो दक्षिण आशियात प्रचंड लोकप्रिय ठरला. याच यशामुळे गीतमाला शो 42 वर्षांपर्यंत चालला.

5 हजार रेडिओ कार्यक्रमांना स्वत:चा आवाज

एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून अमीन सयानी यांनी विक्रम नोंदविला होता. त्यांनी 54 हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आणि त्यात स्वत:चा आवाज दिला. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉम्समध्ये त्यांचे नाव सर्वाधिक 19 हजार जिंगल्स आणि व्हॉइस ओव्हरसाठी नोंद आहे.

सयानींनी भारतीय ब्रॉडकास्टिंगमध्ये आणली क्रांती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमीन सयानी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अमीन सयानी यांच्या सुमधूर आवाजात सौंदर्य अन् उत्साह असायचा. या आवाजाद्वारे त्यांनी अनेक पिढ्यांना जोडून ठेवले. स्वत:च्या कामाद्वारे त्यांनी भारतीय ब्रॉडकास्टिंगच्या जगतात क्रांती घडविली आणि स्वत:च्या श्रोत्यांसोबत विशेष बंध निर्माण केला. त्यांच्या निधनामुळे मी दु:खी आहे. त्यांचे कुटुंबीय, चहते आणि सर्व रेडिओप्रेमींचे मी सांत्वन करत असल्याचे मोदींनी नमूद केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article