For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑलिम्पिक अॅथलेटिक्समधील विजेत्यांना मिळणार 50 हजार डॉलर्सचे बक्षीस

06:05 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑलिम्पिक अॅथलेटिक्समधील विजेत्यांना मिळणार 50 हजार डॉलर्सचे बक्षीस
Advertisement

‘वर्ल्ड अॅथलेटिक्स’चे अभिनव पाऊल

Advertisement

वृत्तसंस्था/ मोनॅको

यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील 48 अॅथलेटिक्स स्पर्धांतील सुवर्णपदक विजेत्यांना जागतिक अॅथलेटिक्सकडून 50,000 डॉलर्सचे बक्षीस दिले जाईल. ऑलिम्पिकमध्ये अशा प्रकारे बक्षीस दिले जाण्याची ही पहिली खेप आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये ही योजना आणखी विस्तृत करून तिन्ही पदक विजेत्यांना बक्षिसाची रक्कम दिली जाणार आहे.

Advertisement

टोकियो ऑलिम्पिकमध्ये अव्वल स्थान पटकावणाऱ्या नीरज चोप्राकडून पॅरिसमध्ये सुवर्णपदकाची आशा भारताला आहे. ऑलिम्पिक खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो ट्रॅक आणि फिल्ड प्रकारातील पहिला भारतीय अॅथलीट आणि वैयक्तिक खेळांमधील एकंदरित दुसरा खेळाडू ठरला होता. बुधवारी जाहीर झालेल्या ऐतिहासिक निर्णयासह ‘वर्ल्ड अॅथलेटिक्स’ हा ऑलिम्पिक खेळांमध्ये बक्षिसाची रक्कम देणारा पहिला आंतरराष्ट्रीय महासंघ बनेल.

‘वर्ल्ड अॅथलेटिक्स ऑलिम्पिक खेळांमध्ये पारितोषिकाची रक्कम देणारा पहिला आंतरराष्ट्रीय महासंघ बनेल, पॅरिसमधील या ऑलिम्पिक खेळांपासून क्रीडा क्षेत्रातील यशाचे शिखर गाठणाऱ्या क्रीडापटूंना आर्थिक स्वरुपात बक्षीस दिले जाईल’, असे महासंघाने एका निवेदनात म्हटले आहे. ‘वर्ल्ड अॅथलेटिक्स’चे अध्यक्ष सॅबेस्तियन को यांनी म्हटले आहे की, ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्यांस बक्षिसाची रक्कम देण्यास सुरुवात करणे हा सदर आंतरराष्ट्रीय महासंघासाठी तसेच संपूर्ण अॅथलेटिक्ससाठी एक महत्त्वाचा क्षण आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आपल्या महसुलाचा जो हिस्सा दिलेला आहे त्यातून 2.4 दशलक्ष डॉलर्स ही बक्षिसे देण्यासाठी काढून ठेवलेले आहेत. सदर हिस्सा वर्ल्ड अॅथलेटिक्सला दर चार वर्षांनी प्राप्त होतो. पॅरिसमधील 48 अॅथलेटिक्स स्पर्धांत सुवर्णपदके जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी 50,000 डॉलर्सचे (ऊ. 41.60 लाख) बक्षीस देण्यासाठी त्याचा वापर केला जाईल, असे महासंघाने म्हटले आहे.

Advertisement

.