महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जितू, पूजा, अनंत, विजया, परशराम, पल्लवी, पांडुरंग, संजय, ज्योती विजेते

06:05 AM Jan 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकमान्य मॅरेथॉन : संजय, प्रियांका, अनिकेत, सानिका, विजय, दिक्षिता, संसार, ईशानी, आदर्श, शिवानी विजयी

Advertisement

बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि लोककल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या लोकमान्य मॅरेथॉन स्पर्धेत जितू गुर्जर, पुजा यादव, अनंत गावकर, विजया खाडे, परशराम कुणगी, पल्लवी मूग, पांडुरंग चौगुले, संजय पाटील, ज्योती खाणीकर, अजयकुमार, प्रियांका कुपते, अनिकेत खाडे, सानिका नलवडे, संसार धामणेकर, ईशानी कुलम, आदर्श गायकवाड, शिवानी शेलार, विजय सावरतकर, दिक्षिता नाईक यांनी विजेतेपद मिळविले.

Advertisement

स्पर्धेचे उद्घाटन टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा, तरुण भारतचे समुह प्रमुख व सल्लागार संपादक, लोकमान्य सोसायटीचे संस्थापक चेअरमन डॉ. किरण ठाकुर, एमएलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडीअर जॉयदीप मुखर्जी, माजी आमदार महांतेश कवठगीमठ, आमदार शशिकला जोल्ले, मलगौडा पाटील, रमाकांत कोंडुसकर, अजित गरगट्टी, गजानन धामणेकर, पंढरी परब, सई ठाकुर-बिजलानी, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले, कर्नल दीपक गुरंग यांच्या हस्ते ध्वज उंचावून करण्यात आले. सदर स्पर्धा 10, 5, 3 कि.मी. अंतर व विविध वयोगटात घेण्यात आली.

स्पर्धेनंतर बक्षीस वितरण सानिया मिर्झा, तरुण भारतचे समुह प्रमुख व सल्लागार संपादक, लोकमान्य सोसायटीचे संस्थापक चेअरमन डॉ. किरण ठाकुर, मलगौडा पाटील, अजित गरगट्टी, गजानन धामणेकर, पंढरी परब, सई ठाकुर-बिजलानी, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले, कर्नल दीपक गुरंग यांच्या हस्ते रोख रक्कम, पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व तीन हजार स्पर्धकांना पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लोकमान्य को.ऑप. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

महत्वाची सूचना

लोकमान्य सोसायटी आणि रन इंडिया यांच्यात झालेल्या करारानुसार, स्पर्धकांचे बिब क्रमांक आणि विजेते ठरविण्याची पूर्ण जबाबदारी रन इंडिया कडे सोपविण्यात आली होती.लोकमान्य मॅरेथॉन 2025 मधील विजेते आणि अंतिम निकाल रन इंडिया द्वारे घोषित करण्यात आले आहेत.

सर्व सहभागी स्पर्धकांनी कृपया ही बाबलक्षातघ्यावी

निकाल पुढीलप्रमाणे

10 कि.मी. धावणे

5 कि.मी. धावणे

3 कि.मी. धावणे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article