द वाइल्ड रोबोट’ 18 ऑक्टोबरला झळकणार
मैत्री बदलणार रोबोटचे आयुष्य
युनिव्हर्सल पिक्चर्स आणि क्रिस सँडर्सकडून दिग्दर्शित ‘द वाइल्ड रोबोट’ हा चित्रपट 18 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सँडर्स यांना ‘द क्रूड्स अँड लिलो अँड स्टिच’साठी ओळखले जाते. द वाइल्ड रोबोट या चित्रपटात लुपिता न्योंगो, पेड्रो पास्कल, कॅथरीन ओहारा, बिल निघी, किट कॉनर, मॅट बेरी, विंग रेम्स, मार्क हॅमिल आणि स्टेफनी हसू यासारखे कलाकार दिसून येणार आहेत.
या चित्रपटात ‘द वाइल्ड रोबोट’ जो युनिट रोजम 7134 मधील असून त्यांना लुपिता न्योंगो या नावानेही ओळखले जाते. हा एका जहाजाच्या अवशेषाखाली सापडलेला रोबोट असून जो त्या बेटाच्या आव्हानांचा सामना करतो. यादरम्यान रोजम स्वत:च्या नव्या स्थितीसोबत ताळमेळ निर्माण करतो. बेटावरील जीवांसोबत संबंध निर्माण करतो, ज्यात कोल्हा, पोसम, हंस आणि किट कॉनर सामील आहे. ब्राइटवेल रोजमला बेटावरील आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करतो.
चित्रपटाच्या प्रारंभी रोजम एक निर्जी रोबोट आहे, ब्राइटविल त्याच्याबद्दल प्रेम दाखवितो आणि मग त्यांचे नाते अधिक मजबूत होते. त्यांचे नाते कहाणीत नावीन्य निर्माण करते असे किट कॉनर यांनी म्हटले आहे. एक अनोळखी मैत्री देखील तुमचे जीवन बदलू शकते हा संदेश या कहाणीतून देण्यात आला आहे. स्वत:ची आकर्षक कहाणी आणि मनस्पर्शी संदेशासोबत हा चित्रपट 18 ऑक्टोबर रोजी हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.