पत्नी पतीकडून आकारते शुल्क
अमेरिकेतील एक महिला गृहिणी म्हणून कायम राहण्यासाठी पतीकडून दर आठवड्याला 100 डॉलर्सचे शुल्क घेते. पतीला देखील यावर कुठलाच आक्षेप नाही. माझा पती स्वयंपाक करणे आणि घराच्या साफसफाईसाठी दर आठवड्याला मला जवळपास 100 डॉलर्स देतो. हे माझे गृहिणी म्हणून कायम राहण्याचे वेतन असल्याचे महिलेचे सांगणे आहे. माझ्या पतीने मला घराची देखभाल करण्याची नोकरी दिली आहे. ही माझी आतापर्यंतची सर्वात चांगली नोकरी आहे. मला याचे अनेक लाभ मिळत आहेत. मी अन्य महिलांना देखील स्वत:च्या या आर्थिक यशाबद्दल सांगते आणि अशी जीवनशैली अंगिकारण्यासाठी प्रेरित करते असे 28 वर्षीय एलिसा सांगते. एलिसाच्या युट्यूब चॅनेलवर 1,82,000 हून अधिक सब्सक्रायबर्स असून त्यांना ती एक पारंपरिक गृहिणी होण्याच्या लाभांविषयी सांगत असते.
सैन्यात काम करायचे पती-पत्नी
आम्ही जेव्हा सैन्यात होतो, तेव्हा आमची भेट झाली होती. तेव्हा दोघेही एकत्र काम करत शिक्षण घेत होतो. त्याचवेळी आम्ही डेटिंग सुरु केले होते. मी स्वत:ची कारकीर्द आणि महत्त्वाकांक्षा मागे ठेवून एक घरगुती जीवनशैली स्वीकारेन याची जाणीव मला तेव्हा नव्हती, असे एलिसाने म्हटले आहे.
सामान्य जीवनाची होती इच्छा
पती घर अणि स्वत:वर काही आणखी लक्ष देऊ इच्छितो असे मला वाटले होते. याकरता जॉब सोडून एका सामान्य गृहिणीप्रमाणे घराची देखभाल करणे आवश्यक होते. यामुळे दोघांचे नाते सामान्य राहून आम्ही आनंदी आहोत. मी अडीच वर्षांपासून टॉमसोबत आहे अणि लवकरच आई होणार आहे, असे एलिसाने सांगितले आहे.
दर आठवड्याला 100 डॉलर्स
मी एक ट्रायथलिट होऊ इच्छिते, हीच माझी मानसिकता होती. परंतु तरीही आम्ही 1950 च्या दशकातील जीवनशैली अंगिकारण्याचा निर्णय घेतला. मी गृहिणी होण्याचा निर्णय घेतल्यावर टॉम आनंदी झाला. परंतु मला जॉब सोडावा लागणार असल्याने मी पतीकडून दर आठवड्याला 100 डॉलर्सचे वेतन मागितले, याला त्याने आनंदाने होकार दिल्याचे एलिसाने सांगितले.
जॉबपेक्षा अधिक मिळतो पगार
एलिसा ही गरज नसलेली कुठलीच गोष्ट मागत नाही. ती आर्थिक स्वरुपात खूपच शिस्तप्रिय असल्याचे टॉमचे सांगणे आहे. टॉम या तडजोडीमुळे अत्यंत आनंदी आहे. यामुळे मला तणावमुक्त जीवन जगण्याची संधी मिळाल्याचे टॉमने म्हटले आहे. मी आता विवाहित आहे, सैन्यात राहून मी जितकी कमाई करू शकत होते, त्याहून अधिक कमाई मी आता घरी राहून करत असल्याचे एलिसाने म्हटले आहे.