For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संपूर्ण चीन आता ‘मिशन दिव्यास्त्र’च्या कवेत

06:48 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
संपूर्ण चीन आता ‘मिशन दिव्यास्त्र’च्या कवेत
Advertisement

अग्नि-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी : 5000 किलोमीटर रेंज : ड्रॅगनसह अर्धा युरोप आता भारताच्या धोक्याच्या छायेत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताने सोमवारी ‘मिशन दिव्यास्त्र’ मोहिमेंतर्गत अग्नि-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (‘एमआयआरव्ही’) तंत्रज्ञानासह स्वदेशी बनावटीच्या अग्नि-5 क्षेपणास्त्राची ही पहिली उ•ाण चाचणी होती. हे क्षेपणास्त्र वेगवेगळ्या ठिकाणी अनेक युद्ध आघाड्यांवर तैनात केले जाऊ शकते. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या संचालिका महिला असून त्यात महिलांचे महत्त्वाचे योगदान आहे. ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञानासह अग्नि-5 क्षेपणास्त्राच्या पहिल्या यशस्वी चाचणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी मोठी घोषणा करत डीआरडीओचे ‘मिशन दिव्यास्त्र’ यशस्वी झाल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याची घोषणा केली. ‘मिशन दिव्यास्त्र’साठी आमच्या डीआरडीओ शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो. मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल तंत्रज्ञानासह स्वदेशी विकसित अग्नि-5 क्षेपणास्त्राची पहिली उ•ाण चाचणी सफल झाली, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर लिहिला आहे.

भारताकडे ‘अग्नि’ मालिकेतील 1 ते 5 पर्यंतची क्षेपणास्त्रे आहेत, त्यांच्या रेंज वेगवेगळ्या आहेत. या मालिकेतील अग्नि-5 हे सर्वात खास असून ते क्षेपणास्त्र 5 हजारांहून अधिक अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे. भारताने या चाचणीसाठी बऱ्याच दिवसांपासून तयारी केली होती. मात्र ही परीक्षा कधी होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 16 मार्चपर्यंत भारत कधीही याची चाचणी घेईल, असा विश्वास होता. यासाठी ओडिशाच्या किनारपट्टीजवळील एपीजे अब्दुल कलाम बेटापासून 3,500 किमीपर्यंतचा भाग नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला होता.

चीन-पाकिस्तान पूर्णपणे भारताच्या टप्प्यात

अग्नि-5 क्षेपणास्त्राची श्रेणी आणि वेग सर्वाधिक असून चीन आणि पाकिस्तानला ते काही मिनिटात नष्ट करू शकते. दिल्ली ते बीजिंग हे अंतर 3,791 किमी आहे, हे अंतर पार करण्यासाठी या क्षेपणास्त्राला 12.63 मिनिटे लागतील. याशिवाय पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला पोहोचण्यासाठी केवळ दीड मिनिटांचा अवधी लागेल. नवी दिल्ली ते इस्लामाबाद हे 679 किमीचे अंतर इतक्मया कमी वेळात ते कापेल. पाकिस्तान आणि चीनच नाही तर, अफगाणिस्तान आणि इराणही आता भारताच्या आवाक्मयात येईल, असा दावा शास्त्रज्ञांकडून केला जात आहे

अग्नि-5 ची खासियत....

► अग्नि-5 क्षेपणास्त्र ‘एमआयआरव्ही’ म्हणजेच मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. याचा अर्थ ते एकाचवेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करू शकते.

► हे मध्यवर्ती श्रेणीचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून ते स्वत:सोबत आण्विक शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. त्यात थर्मोबॅरिक शस्त्रेही बसवता येतात. थर्मोबेरिक बॉम्बला ‘व्हॅक्मयूम बॉम्ब’ही म्हणतात.

► या क्षेपणास्त्राचा वेग 6 किमी प्रतिसेकंदापेक्षा जास्त असून ते लक्ष्यापासून 40 मीटर दूर पडले तरी शत्रूला पूर्णपणे नष्ट करू शकते. ते 450 किमी उंचीवर पोहोचू शकते.

► ‘एमआयआरव्ही’ ही प्रणाली स्वदेशी एव्हीओनिक्स प्रणाली आणि उच्च अचूकता सेन्सर पॅकेजेससह सुसज्ज आहे. आता भारत ‘एमआयआरव्ही’ क्षमता असलेल्या देशांच्या निवडक गटात सामील झाला.

► हे क्षेपणास्त्र अग्नि मालिकेतील सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. त्याचा मारक पल्ला 5,000 किमीपेक्षा जास्त आहे. भारताने डिसेंबर 2022 मध्ये  अण्वस्त्र-सक्षम क्षेपणास्त्राची चाचणी केली होती.

Advertisement
Tags :

.