For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनतेचे कल्याण हेच ध्येय! मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

06:24 AM Aug 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
जनतेचे कल्याण हेच ध्येय  मुख्यमंत्री डी  के  शिवकुमार
Advertisement

राज्यातील सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर :

Advertisement

माझ्यासह माझे मंत्रिमंडळ व सर्व अधिकारी हे सरकारी कर्मचारी आहेत. ही आमची ‘टीम कर्नाटक’ आहे. आम्ही सर्वांनी मिळून एकत्र काम करूया. जनतेच्या समस्यांवर तोडगा काढणे आणि त्यांचे कल्याण करणे हे आमचे ध्येय आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केले.

मंगळवारी विधानसौध येथून सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले, आमच्यासह 5.50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचा सदुपयोग केला पाहिजे.

इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. तुमच्याकडे भरपूर शिक्षण आणि अनुभव आहे. त्या तुलनेने मी फारसे शिक्षण घेतलेले नाही. पण माझ्याकडे जिल्हा पंचायत सदस्य, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून अनुभव आहे. तुम्ही जनता आणि सरकार यांच्यातील दुवा आहात. अधिकारावर असताना आपण मागे कोणत्या पाऊलखुणा सोडून जातो, हे महत्त्वाचे आहे, असा कानमंत्रही मुख्यमंत्र्यांनी दिला.

लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. मला इतिहास वाचायचा किंवा लिहायचा नाही. मला इतिहास घडवायचा आहे. आपले राज्य केवळ सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेमुळेच या स्तरापर्यंत पोहोचले आहे, असेही ते म्हणाले.

कायद्याच्या चौकटीत राहून लोकांच्या समस्यांना प्रतिसाद द्या

सरकारी कर्मचारी संघटनेने गॅरंटी योजनांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल अभिनंदन. खात्याच्या मुख्यालयात राखून देखील काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पुन्हा का जबाबदारी सोपवावी? सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात राहूनच काम केले पाहिजे. राज्याचा एक महत्त्वाचा कर्मचारी म्हणून, सरकारच्या विचारांना आणि भविष्यातील वाटचालीस मार्गदर्शन करण्यासाठी मी आलो आहे. तुम्ही शुद्ध मनाने आणि पारदर्शकतेने काम केल्यास समस्येवर तोडगा काढू शकता, असा सल्लाही मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिला.

भ्रष्टाचारविरोधी कारवाईत कोणतीही तडजोड नाही!

भ्रष्टाचारविरोधी कारवाईच्या बाबतील आपण कोणतीही तडजोड करणार नाही.  अधिकाऱ्यांच्या प्रत्येक कामाचे मूल्यमापन करेन. प्रत्येक लाभार्थ्याची माहिती जपून ठेवली पाहिजे. लाभार्थी सरकारी सुविधांचा वापर कसा करत आहेत, हे तपासले पाहिजे. आमच्यात काहीजण दुप्पट बिले बनवण्यावर काम करत आहेत. अशा लोकांना नेस्तनाबूत करेन. बोगस बिलांना माझ्या सरकारमध्ये थारा नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Advertisement
Tags :

.