‘आईज’ वेबसीरिज ओटीटीवर येतेय
कनी कुश्रुति यांची मुख्य भूमिका
प्रेम जेथे एक आत्मीय अनुभव आहे तर दुसरीकडे प्रेमात वाहवत जाणे तितकेच त्रासदायक आहे. प्रेम अन् मूर्खपणावर आधारित कहाणी घेऊन एक सायकोलॉजिकल थ्रिलर वेबसीरिज ‘आइज’ येत असून ती मूळ स्वरुपात मल्याळी भाषेत आहे, परंतु ओटीटीवरती हिंदी डब वर्जनमध्ये स्ट्रीम होणार आहे. या सीरिजमध्ये ‘ऑल वी इमेजिन एज लाइट’ आणि ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ फेम कनी कुश्रुति मुख्य भूमिकेत आहे.
‘आइज’चे दिग्दर्शन मनु अशोकनने केले आहे. अंजना नायरने या सीरिजची कहाणी लिहिली आहे. ही सीरिज सोनी लिवची ओरिजिनल मल्याळी सीरिज असून ती 9 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याच्या कहाणीच्या केंद्रस्थानी पोलीस अधिकारी टीना सेबेस्टियन (कनी कुश्रुति) आहे. ती स्वत:च्या ड्युटीबद्दल समर्पित आहे, खासकरून महिलांच्या सुरक्षेवरून. टीना अशाच एका प्रकरणाच्या तपासात गुंतत जाते. ही एक प्रेमकहाणी असून ती डेटिंग अॅपद्वारे सुरु होते. प्रारंभी भेटीत वचने आणि सुंदर स्वप्ने आहेत. परंतु नंतर माथेफिरू प्रियकराचे मूर्खतापूर्ण प्रेम दिसते. तो युवतीच्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवतो, ती कुठे ये-जा करतेय, कुणाला भेटतेय यावर त्याची नजर असते. तसेच युवतीच्या जवळ असलेल्या प्रत्येक माणसाचा तो शत्रू होतो.
शहरात स्टॉकिंगप्रकरणात 12 वी हत्या झाल्याचे कळल्यावर कहाणीत ट्विस्ट येतो. टीना या प्रकरणाचा तपास पुढे नेते आणि पोलीस विभाग एक अॅप आइज घेऊन येतो. हा अॅप कुठल्याही असहज स्थितीत महिलांसाठी सपोर्ट अॅप ओ. परंतु हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत जाते. या सीरिजमध्ये कनी कुश्रुतिसोबत निखिला विमल, देव मोहन, सानिया अयप्पन आणि श्रुती महत्त्वाच्या भूमिकेत आहे.