महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मंगाई मंदिरासमोरील भिंत हटविली

10:55 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सार्वजनिक बांधकाम खात्याची गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई : परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

Advertisement

बेळगाव : वडगाव येथील मंगाई मंदिरासमोर असलेल्या रस्त्यावर भिंत बांधण्यात आली होती. त्यामुळे मंगाईनगरवासियांनी भिंत काढून आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी केली होती. त्याची दखल सार्वजनिक बांधकाम खात्याने घेत गुऊवारी रात्री येथील भिंत पाडून रस्ता मोकळा करण्याच्या कामाला सुऊवात केली होती. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कडेकोट पोलीस बंदोबस्तात या कामाला सुऊवात करण्यात आली होती. यावेळी काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यावर भिंत बांधली असा आरोप मंगाईनगरवासियांनी केला होता.

Advertisement

मंगाई मंदिरापासून मंगाईनगरला जाणाऱ्या रस्त्यावर भिंत बांधण्यात आली होती. त्यामुळे मंगाईनगरवासियांना फेरा मारून ये-जा करावी लागत होती. हा रस्ता खुला करावा, अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम खाते यांच्याकडे केली होती. त्याची दखल सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतली. गुऊवारी रात्री धडक मोहीम राबवून रस्ता खुला करण्याचे काम सुरू केले. जेसीबीच्या साहाय्याने भिंत पाडण्यात आली.

काही महिन्यांपूर्वी मंदिरासमोरच्या रस्त्यावर संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. रस्ताही बंद केला होता. त्यामुळे मंगाईनगरवासियांनी जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच इतर अधिकाऱ्यांकडे रस्ता खुला करून द्यावा, अशी मागणी केली होती. गुऊवारी दिवसभर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोरच महिलांनी ठाण मांडले होते. त्याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्री या कामकाजाला सुऊवात केली. भिंत हटविण्यात येणार असल्यामुळे प्रथम या ठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात केला. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने भिंत पाडण्याच्या कामाला सुऊवात केली. त्यामुळे पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. विविध विभागाचे एसीपी व शहरातील विविध स्थानकांचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article